पुण्यात क्रिकेट सामना सुरु असताना 35 वर्षीय खेळाडूला हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. खेळताना अचानक छातीत दुखू लागल्याने तो जागीच खाली कोसळला.
इमरान पटेल असे त्या खेळाडूचे नाव आहे. फलंदाज इमरान पटेल बुधवारी रात्री एका सामन्या दरम्यान त्याच्या अचानक छातीत जोरात दुखू लागले. त्याच्या काही वेळानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारणे हृदयविकाराचा झटका बोलले जात आहे. पुण्याच्या गरवारे स्टेडिअमवर इमरान पटेल लीग मॅचसाठी सलामीचा फलंदाज म्हणून उतरला होता. काही ओव्हर खेळल्यानंतर त्याने अंपायरला डावा हाथ आणि छातीत जोरात दुखत असल्याचे सांगितले. बोलण झाल्यानंतर तो पुन्हा खेळायला परतला त्यावेळी तो खाली कोसळला. जसा इमरान बेशुद्ध झाला, तसे सगळे खेळाडू त्याच्या दिशेने धावले. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मॅचचे लाईव्ह प्रसारण होत असल्याने सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली.
इमरानच्या पश्चात त्याची पत्नी आणि तीन मुली आहेत. त्याची सगळ्यात लहान मुलगी 4 महिन्याची आहे. इमरान एका क्रिक्रेट टीमचा मालक होता. त्याचा रिअल इस्टेटचा व्यवसाय असून एक ज्युसचे दुकानही चालवत होता.