पुण्यातील कार्यक्रामात मंत्री सामंतांचा मोबाईल हरवला:मंत्र्यांची सुरक्षा किती रसातळाला गेली, याचे हे उत्तम उदाहरण; अंबादास दानवेंचा टोला

1 hour ago 1
पुणे येथे मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल हरवला. या प्रकारावरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्र्यांची सुरक्षा किती रसातळाला गेली, याचे हे उत्तम उदाहरण आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पुण्यातील मेट्रो मार्गिकेचे उद‌्घाटन पार पाडले. या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान, या कार्यक्रमात त्यांचा मोबाईल हरवला. यानंतर त्यांच्या मोबाईलसाठी अनाउंन्समेंट करावी लागली. मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल हरवला आहे. कोणाला सापडल्यास व्यासपीठावर आणून द्यावा, अशी अनाउन्समेंट करण्यात आली. या प्रकारावरून अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला टोला लगावला आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हणाले दानवे? मुंबईत सुरक्षेला चकवा देऊन गृहमंत्री कार्यालयाच्या पाट्या फोडल्या जातात. तर पुण्यात भर कार्यक्रमातून मंत्र्यांचे मोबाईल गायब होतात. मंत्र्यांची सुरक्षाही किती रसातळाला गेली आहे, याचे हे साधे उदाहरण आहे, अशी टीका दानवे यांनी केली आहे. आता मोबाईल एखाद्याने नेला असेल तर त्याला मनोरुग्ण ठरवू नका, म्हणजे झालं! असा टोलाही दानवे यांनी सरकारला लगावला आहे. पीएम मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद‌्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यातील विविध विकासकामांचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. यामध्ये जिल्हा न्यायालय ते स्वारगेट पर्यंतच्या मेट्रो कॉरिडोअरचे उद्घाटन, स्वारगेट ते कात्रजपर्यतच्या भूमिगत मार्गिका आणि भिडे वाड्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मेमोरियलचे भूमिपूजन यांचा समावेश आहे. दरम्यान, याच कार्यक्रमातून मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल हरवला होता. फडणवीसांनी विरोधकांवर साधला निशाणा ज्या लोकांनी आपल्या जीवनभरात एकही विकास काम केले नाही, ते लोकं पुणे मेट्रोच्या लोकार्पण सोहळा पुढे ढकलला गेला आणि लोक छात्या बडवत होते, असा हल्लाबोल भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे. तुम्ही काही तरी करुन दाखवा आणि मग छात्या बडवा, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावाला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article