पुण्यातील सुरक्षेसाठी पोलिस सतर्क:शहरातील 13 टेकड्यांचसह 20 ठिकाणांच्या सुरक्षेसाठी गृह विभागास 70 कोटींचा प्रस्ताव

2 hours ago 1
पुणे शहरातील टेकड्या व अन्य ब्लॅक स्पॉट सुरक्षित केले जावे यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील 13 पेक्षा अधिक टेकड्या आणि 7 पेक्षा अधिक ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून, संबंधित ठिकाणे सीसीटीव्ही आणि लाईट्स च्या माध्यमातून सुरक्षित केली जाणार आहे.पुणे शहरातील 13 टेकड्यांचेसह 20 ठिकाणांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांचा 70 कोटींचा गृह विभागास प्रस्ताव लवकरच देणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. पोलिसांनी केलेल्या सर्व्हेमध्ये हनुमान टेकडी, जुना बोगदा घाट, तळजाई, सुतारदरा, एआरएआय टेकडी, अरण्येश्वर मंदीर, बाणेर टेकडी, बोलाई माता मंदिर, जोगेश्वर मंदीर, वेताळबाबा टेकडी, चतु:श्रृंगी टेकडी, बोपदेव घाट, पारसी ग्राऊंड, पर्वती, कॅनॉल रोड या टेकड्यांसह अन्य ठिकाणांचा समावेश असणार आहे.पुणे शहरातील विविध टेकड्या आणि ब्लॅक स्पॉटवर 600 अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामध्ये 200 पीटीझेड कॅमेरे, 400 फिक्स कॅमेरे, 100 एएनपीआर कॅमेरे यांचा समावेश असणार आहे. याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांसाठी फेस रिडींग कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहेत. टेकड्यांसह ब्लॅक स्पॉटवर पॅनिक बटण देखील असणार आहे. पॅनिक बटण दाबताच थेट पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला अलर्ट मिळणार आहे. याशिवाय पॅनिक बटण दाबताच त्या परिसरातील अन्य कॅमेरे देखील अलर्ट मोडवर जातील असे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनात देखील पॅनिक बटणचा वापर होताच मोठा आलार्म वाजणार आहे, जेणेकरून पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना लगेचच संबंधित ठिकाणी पोहोचण्यास मदत होणार आहे. यासोबतच या ठिकाणी कमीत कमी वेळेत पोलिस पोहोचावे यासाठी ७ विशेष मोबाईल सर्विलन्स व्हेईकल देखील तैनात करण्यात येणारआहेत. पोलिसांच्या या सातही वाहनांमध्ये ड्रोन कॅमेरे देखील असणार आहे. यासाठी अंदाजे 70 कोटी रुपये खर्च येणार असून, यामध्ये पाच वर्षांच्या देखभाल दुरूस्तीचा देखील समावेश असणार आहे.तसेच संबंधित ठिकाणी टु वे पीए सिस्टिम (माईक आणि स्पिकर) देखील लावले जाणार आहेत. याशिवाय रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसावे म्हणून 177 पेक्षा अधिक फ्लड लाइट्स देखील लावले जाणार आहेत. सिटी सर्वेलन्सचे बेस्ट फिचर्स यामध्ये समाविष्ट करण्यात आले असून, यामुळे अनेक अनधिकृत, अवैध घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article