पुरावा नाही पण ईव्हीएम गैरप्रकार ही अनेकांच्या मनातली शंका: शरद पवार Pudhari
Published on
:
30 Nov 2024, 7:33 am
Updated on
:
30 Nov 2024, 7:33 am
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. त्याचा धक्का अनेकांना बसलेला दिसत आहे. निकालानंतर विरोधकांनी मतदारांच्या मतांशी छेडछाड केल्याचा आरोप केला असून पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले. दरम्यान यावर आता शरद पावर यांनी मोठं विधान केलं आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे ईव्हीएम विरोधात आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलाना जेष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, माझ्या हातात पुरावा नाही, पण अनेकांच्या मनात शंका आहे की ईव्हीएमद्वारे निवडणुकीत गैरप्रकार होत आहेत. काही जणांनी याबाबत शंका व्यक्त केली आहे, ज्यामुळे निवडणूक आयोगाची भूमिकाही तपासली जावी लागेल. काही जणांनी अस होऊ शकत अस म्हंटले आहे. निवडणूक आयोग चुकीची भूमिका घेईल अस वाटत नाही.
देशभरात निवडणुका सत्तेचा आणि पैशाचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न होत आहे. स्पष्ट बहुमत असताना सरकार बनत नाही. बाबा आढाव यांचे आंदोलन हे जनतेला जागृत करण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. बाबांनी एकट्याने ही भूमिका घेणं योग्य नाही लोकांनी पण त्यांना साथ दिली पाहिजे, नाही तर लोकशाही धोक्यात येईल. देशाचे सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना लोकशाहीशी काही घेणे देणे नाही. विरोधकांना संसदेत दिलं जात नाही असे देखील ते म्हणाले.