पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महात्मा फुले यांचे महत्वपूर्ण योगदान:प्रा. डॉ. अशोक चोपडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्मृतिदिन
2 hours ago
2
अकोला महाराष्ट्र राज्य क्रांतिकारकांची, संतांची भूमी असून आपल्या राज्याने ऐतिहासिक वारसासह संघर्षातून देशपातळीवर नेतृत्व देखील दिले असून पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महात्मा ज्योतिबा फुले यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे असे गौरवशाली प्रतिपादन सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक, अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे माजी अध्यक्ष लेखक डॉ. अशोक चोपडे यांनी केले. विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. सोळाव्या शतकापासून तब्बल २१ व्या शतकापर्यंत देशांतर्गत घडलेल्या घडामोडींचे, सामाजिक चळवळींचे आणि त्या सुसंगत आजच्या परिस्थितीतील युवकांची भूमिका अतिशय गांभीर्याने विषद करीत सभागृहात उपस्थित प्रत्येकाला आपल्या समाजभानाची जाण डॉ. चोपडे यांनी करून दिली. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अध्यक्षतेत कृषी महाविद्यालय अकोलाच्या समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे प्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यान विद्या डॉ. देवानंद पंचभाई, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप हाडोळे, आदींची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. डॉ. संदीप हाडोळे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन वैभव बनसोड यांनी यावेळी केले. मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी डॉ. अशोक चोपडे. राष्ट्र विकासामधील योगदान सक्षमतेने सिद्ध करावे आपल्या सर्वात मोठ्या लोकशाही जोपासणाऱ्या देशातील सामाजिक एकोपा जोपासत समर्थ आणि आत्मनिर्भर राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर ग्राम विकासासोबतच राष्ट्र विकासामधील आपले योगदान अधिक सक्षमतेने सिद्ध करावे असे आवाहन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. कृषीच्या विद्यार्थ्यांनी महात्मा फुलेचे शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म आदी ग्रंथसंपदा अभ्यासत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करताना आर्थिक -सामाजिक संपन्न समाज निर्मिती हिच महात्मा फुलेना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन डॉ. गडाख यांनी केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)