ठाकरे गटाचे प्रसाद भोइर यांचा केला पराभव
पेणमधून भाजपचे रवी पाटील तिसऱ्यांदा विजयी File Photo
Published on
:
23 Nov 2024, 11:56 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:56 am
पेण : कमलेश ठाकूर
पेण १९१ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रवी पाटील यांना १२३९०७ मते व पोस्टल ७२४ मते अशी एकूण १२४६३१ मते मिळाली. त्यांनी ठाकरे सेना गटाचे प्रसाद भोइर यांच्यावर तब्बल ६०८१० मतांचे लीड घेत पराभव केला. तसेच दुसऱ्यांदा भाजपच्या चिन्हावर तर एकूण तिसऱ्यांदा आमदार म्हणुन विजयी झाले. शेकापचे अतुल म्हात्रे हे केवळ २९१९१ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
पेण विधानसभेची मतमोजणी केंइएस शाळेत झाली. एकुण २८फेऱ्या व शेवटची पोस्ट मते अशी २९ फेऱ्यात झालेल्या मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत भाजपचे उमेदवार रवी पाटील यांनी आघाडी घेतली. ती शेवटच्या २९व्या फेरीपर्यंत आघाडी कायम राखली. प्रत्येक फेरीला २६०० ते ३००० अशी आघाडी ठेवत ही आघाडी शेवटी पोस्टल मतासंह ६०८१० मतांची लीड आघाडी केली आणि भाजपचे उमेदवार रवी पाटील हे तिसऱ्यांदा विजयी झाले.
६ व्या फेरी पासूनच विजय निश्चित
आमदार रवी पाटील यांनी ६ व्याफेरी अखेर १९२०९ एवढी भक्कम आघाडी शेकाप आणि शिवसेना उमेदवारांच्या विरोधात घेतली आणि तेथेच विजय निश्चित केला. कारण ही आघाडी तोडणे दोनही उमेदवारांना शक्य नव्हते. यानंतर दोनही प्रतिस्पर्धी गटाच्या प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला.
२९ व्या फेरी अखेर पेण मतदार संघाचा निकाल
भाजप रवी पाटील_एकूण मते १२४६३१
शिवसेना ठाकरे गट प्रसाद भोइर _६३८२१
शेकाप अतुल म्हात्रे _२९१९१
मंगल पाटील (अभिनव भारत पार्टी)_२२६६,
अनुजा साळवी बहुजन समाज पार्टी)_१२४१
देवेंद्र कोळी_वंचित बहुजन आघाडी _१७०१
विश्वास बागूल _अपक्ष (१२०३)
कुणीही नाही (नोटा)_२४७३,
यांना मिळाली.
त्यातील रवी पाटील यांना _१२४६३१
तर प्रसाद भोइर यांना _६३८२१
व शेकाप अतुल म्हात्रे यांना२९१९१मते मिळाली. म्हणजेच ६०८१० मतांचा लीड घेत रवी पाटील हे विजयी झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांनी घोषित केले.
पेण मध्ये पहिल्या फेरीपासून कमळाचे ध्वज
पेण मधील कार्यकर्त्यांना रवी पाटील यांच्या विजयाची खात्री असल्याने पहिल्या फेरीलाच २६६६ मतांची आघाडी घेतली. तेव्हापासूनच भाजप कार्यकर्त्यांनी कमळाचे ध्वज फडकवण्यास सुरुवात केली. ती शेवटच्या फेरीपर्यंत शेकडो ध्वज घेउन हजारो कार्यकर्ते विजयी घोषणा देत होते. पेण भाजप कार्यालयात व आमदार रवी पाटील यांच्या घरासमोर हजारो कार्यकर्ते सकाळपासूनच जमण्यास सुरुवात झाले होते. अनेक महिलांनी रवी पाटील आगे बढो, देवेंद्र फडणवीस आगे बढो, एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है आशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. पेण भाजप कार्यालयापासून विजयी मिरवणूक आमदार रवी पाटील यांच्या घरापर्यंत काढण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गुलाल उधळत, नाचन्यात रममान झाले होते.