Published on
:
23 Nov 2024, 2:39 pm
Updated on
:
23 Nov 2024, 2:39 pm
पैठण : पैठण विधानसभा मतदार संघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार विलास भुमरे विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांचा २९ हजार १९२ मतांंनी पराभव करीत दणदणीत विजय मिळविला असून. महाआघाडीचे अनिवासी स्थानिक पातळीवरील पुढाऱ्यांना चांगलाच चपराक दिली आहे.
या विजयाने पैठण मतदार संघावर पुन्हा एकदा खासदार संदिपान भुमरे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. निवडणुकीत एकत्र आलेल्या अनिवासी महाआघाडीचे विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात उमेदवार विलास भुमरे एका अपघातात जखमी असल्याने त्यांना प्रचारासाठी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेता आल्या नाहीत. मात्र राजकारणात मुरब्बी, अनुभवी असलेले खासदार संदिपान भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांनी प्रचाराची सर्व जबाबदारी खांद्यावर घेत मोठ्या कौशल्याने व नियोजन करून विजय खेचून आणला. विलास भुमरे यांंच्या विजयामुळे पैठण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी शनिवारी सकाळी आठ वाजता नाथसागर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या संतपीठ प्रशासकीय इमारतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नीलम बाफना, सहाय्यक निवडणूक अधिकारी सारंग चव्हाण, नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरक्षक संजय देशमुख, नायब तहसीलदार कैलास बहुरे, राहुल बनसोड, निवडणूक विभागाचे बालाजी कांबळे, सतीश पेंडसे, रेवणनाथ खेडकर, अमोल पाखरे यांच्यासह मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी मतमोजणी उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत प्रारंभ केले. प्रथम पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली यात विलास भुमरे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. त्यानंतर झालेल्या ईव्हीएम मशिन यंत्राची मोजणी करण्यात आली. यात पहिल्या फेरीपासुनच महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांनी आघाडी घेत विजयाच्या दिशेने घोडदौड सुरु ठेवली. आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवली. मतदानामध्ये आघाडी मिळाल्याने छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे हे आपल्या मोजक्या समर्थकांसह मतमोजणी केंद्रात दाखल झाले होते. यावेळी विलास भुमरे यांनी दत्ता गोर्डे यांचा दणदणीत पराभव केला.
एकुण २६ व्या फेरीत मतमोजणी झाली. यात विलास भुमरे यांना पोस्टल मतदानासह १ लाख ३२ हजार ४७४ मते तर दत्ता गोर्डेंना १ लाख ३ हजार २८२ मते मिळाली. अंतिम मतमोजणीत २९ हजार १९२ मतांची आघाडी मिळाल्याने विलास भुमरे यांचा विजय घोषित करण्यात आला. विलास भुमरे यांचा विजय होताच खासदार संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत पैठण शहरासह ग्रामीण भागातील पाचोड येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या विजय मिरवणुकीत राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नाथ मंदिर कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, विनोद बोंबले,
तालुकाप्रमुख अण्णा लबडे, उपतालुकाप्रमुख राजेंद्र मापारी, शहरप्रमुख तुषार पाटील, संतोष बोठे, राजेंद्र तांबे, शेखर शिंदे, प्रशांत जगदाळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, राजू गायकवाड, रवींद्र शिसोदे, रवींद्र शिसोदे, किशोर चौधरी, साईनाथ व्होरकटे, नामदेव खरात, अमोल जाधव, परमेश्वर डांगे, शहादेव लोहारे, मनोज लोहारे, श्याम काळे, सुरज पांडव, रोहित अंबिलवादे, शिवराज पारिक, महिला आघाडी प्रमुख ज्योती काकडे, आदी उपस्थित होते. विजयावर प्रतिक्रिया देताना खासदार संदिपान भुमरे म्हणाले की, मतदारांनी मतपेटीतून माझ्यावर विश्वास टाकून विकासाची कार्याची पावती देऊन विलास भुमरे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. त्या मतदारांचे ऋण आपण विकासकामांच्या माध्यमातून फेडू. विजयासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांंचा या विजयात मोठा वाटा असल्याचे सांगितले यापुढे मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला तडा न जावू देता सर्वांना सोबत घेऊन आपण विकास कामे मोठ्या जोमाने करु असे विश्वास खा. संदिपान भुमरे यांनी यावेळी दैनिक पुढारी शी बोलताना व्यक्त केला आहे.
दरम्यान या निवडणुकीत एकूण १७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. रासपाचे प्रकाश दिलवाले ६ हजार ३३४, वंचित आघाडीचे अरुण घोडके ३ हजार १८७, वामन साठे १ हजार ६६९, विजय बचके १२१४, संतोष राठोड १ हजार २४७, रियाज शेख ७९०, कृष्णा गिरगे ६००, आरिफ शेख ,५०५, इमरान शेख ४७६, कैलास तवार २६१, अझहर शेख २८० या उमेदवारांना असे एकूण मतदान मिळालेले आहे.