पोरखेळ थांबवा, ST ची भाडेवाढ मागे घ्या:दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाहीत तर परिवहन खात्याला वाली कोण? काँग्रेसचा सवाल

13 hours ago 2
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एसटीच्या तिकीट दरवाढीवरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. एसटीची भाडेवाढ परिवहन मंत्र्यांनी केली नाही, तर या खात्याला वाली कोण? निर्णय अंगलट आले की अधिकाऱ्यांनी केले आणि काही चांगले झाले की श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करायचे अशी महायुतीमधील मंत्र्यांच्या कामाची पद्धत सुरू झाली आहे, असे ते म्हणालेत. महायुती सरकारने एसटीच्या तिकीटदरात तब्बल 14.97 टक्क्यांची दरवाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे. त्यातच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही दरवाढ सरकारने नव्हे तर अधिकाऱ्यांनी केल्याचा दावा केला. एकप्रकारे त्यांनी भाडेवाडीच्या निर्णयासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पोरखेळ थांबवून तात्काळ दरवाढ मागे घ्या विजय वडेट्टीवार म्हणाले, एसटीची भाडेवाढ परिवहन मंत्र्यांनी केली नाही आणि दरवाढीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध असेल तर एसटीची भाडेवाढ तत्काळ मागे घेऊन जनतेला दिलासा देण्यात यावा. एसटी दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाहीत तर या परिवहन खात्याला वाली कोण? निर्णय अंगलट आले की अधिकाऱ्यांनी केले आणि चांगले काही झाले की श्रेय घेण्यासाठी पुढे - पुढे यायचे अशी महायुतीतील मंत्र्यांची काम करण्याची पद्धत सुरू आहे. महायुती सरकारने हा अधिकाऱ्यांचा पोरखेळ थांबवून तात्काळ दरवाढ मागे घ्यावी. मंत्र्यांनी सरकार म्हणून ही दरवाढ केली नसेल तर कोण करत आहे? कारण, तिथे एसटी महामंडळाचा अध्यक्ष नाही. अध्यक्ष असेल तर सरकारच्या परवानगीशिवाय करता येत नाही. म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे की, मंत्री व उपमुख्यमंत्री आपण दरवाढ केली नसल्याचे म्हणत असतील तर ही दरवाढ त्वरीत मागे घेण्याचा आदेश काढावा. गरीब, सामान्य, मध्यमवर्गीय, मजूर व कामगारांना दिलासा द्यावा. परिवाहन खाते चालवतंय कोण? भाडेवाडीचा निर्णय परिवहन मंत्री घेत नसतील, त्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांना नसेल, तर हे खाते चालवतंय कोण? ही भाडेवाड केली कुणी? ही सर्व खाती अधिकारी चालवतात व मंत्री घरी बसून आदेश काढतात असा त्याचा अर्थ होतो. या सरकारमध्ये सगळा पोरखेळ सुरू आहे. गंमत - जमंत सुरू आहे. सरकारला कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार? ते कारवाईसाठी पात्र नाहीत का, मग मंत्री त्यांच्यावर कारवाई करणार का? हा प्रश्न उपस्थित होतो, असे वडेट्टीवार म्हणाले. हे ही वाचा... एसटी भाडे वाढीविरोधात ठाकरे गट आक्रमक:आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर उद्या राज्यभरात चक्काजाम आंदोलन मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा स्थापन झालेल्या महायुती सरकारने एसटी महामंडळाच्या तिकीट दरामध्ये वाढ केली आहे. या निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता राज्यातील प्रमुख एसटी डेपोजवळ हे चक्काजाम आंदोलन होणार आहे. या माध्यमातून एसटी भाडे वाढीविरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजच चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article