पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्यासह एपीआय निलंबित:पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश

2 hours ago 2
आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात एका व्यक्तीस अटक न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनचे तत्कालीन आणि सध्या गुन्हे शाखेच्या दंगल नियंत्रण पथकामध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलिस निरीक्षक संतोष क्षीरसागर यांना पोलिस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश दिले आहेत. पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे गुन्हे शाखेत यापूर्वी काम करत होते. बहिरट हे गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना, बहिरट यांच्या सांगण्यावरुन फसवणुकीच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक संतोष क्षीरसागर याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची लाच मागणी केली होती. मे २०२४ मध्ये ही घटना घडली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली होती. तक्रारीची एसीबीकडून पडताळणी करण्यात आली त्यावेळी क्षीरसागर याने तडजोडीत दोन लाख रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शविली होती. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा घटनांमुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवून श्रीहरी बहिरट आणि क्षीरसागर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन कालावधीत बहिरट यांनी दररोज पोलिस नियंत्रण कक्ष आणि क्षीरसागर यांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात हजेरी द्यावी, असे आदेशात सांगितले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article