Published on
:
23 Nov 2024, 1:28 pm
Updated on
:
23 Nov 2024, 1:28 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला आहे. या विजयाबद्दल भाजपचे नेते अमित शहा यांनी टि्वटद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
या ऐतिहासिक जनादेशासाठी महाराष्ट्राच्या जनतेला कोटी कोटी प्रणाम. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्राने, विकासाबरोबरच संस्कृती आणि राष्ट्राला सर्वोच्च स्थानी ठेवणाऱ्या महायुतीला एवढे प्रचंड बहुमत देऊन, संभ्रम आणि खोटेपणाच्या आधारे संविधानाचे नकली हितचिंतक बनणाऱ्यांच्या दुकानाला टाळे ठोकण्याचे काम केले आहे. हा विजय प्रत्येक महाराष्ट्रवासियाचा विजय आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.Maharashtra Election Results |
जय महाराष्ट्र
इस ऐतिहासिक जनादेश के लिए महाराष्ट्र की जनता का कोटि-कोटि वंदन।
छत्रपति शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर जी, ज्योतिबा फुले जी और वीर सावरकर जी की पुण्यभूमि महाराष्ट्र ने विकास के साथ-साथ संस्कृति और राष्ट्र को सर्वोपरि रखने वाले महायुति गठबंधन को इतना प्रचंड…
— Amit Shah (@AmitShah) November 23, 2024