Cyclone Fengal updates|'फेंगल' चक्रीवादळ येत्या २४ तासांत तीव्र होणार, तामिळनाडूला मुसळधारेचा इशाराIsro X
Published on
:
29 Nov 2024, 6:47 am
Updated on
:
29 Nov 2024, 6:47 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: 'फेंगल' चक्रीवादळ पुढील २४ तासांत तीव्र होण्याचा अंदाज आहे. यामुळे उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेश किनारी भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच या राज्यातील किनारपट्टी भागांत जोरदार वारे वाहण्याचा अंदाज असून काही भागांत संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त 'हिंदुस्थान टाईम्स'ने दिले आहे.
तामिळनाडूतील बहुतांश भागात मुसळधार
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ 'फेंगल' तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांकडे येत आहे. त्यामुळे तामिळनाडून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार आणि व्यापक पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
It is likely to move northwestwards and intensify into a cyclonic storm during next 12 hours. Thereafter, it is likely to continue to move northwestwards and cross north Tamil Nadu Puducherry coasts between Karaikal and Mahabalipuram close to Puducherry as a cyclonic storm with a… pic.twitter.com/saJ9NQkLSU
— India Meteorological Department (@Indiametdept) November 29, 2024३० नोव्हेंबरला चक्रीवादळ किनारा ओलांडणार
फेंगल चक्रीवादळ येत्या २४ तासांत तीव्र होण्याचा अंदाज आहे. "ते उत्तर-वायव्य दिशेने सरकत असून शनिवारी 30 तारखेच्या सकाळपर्यंत कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावाखाली, तामिळनाडूच्या बहुतेक भागांमध्ये पुढील 2-3 दिवसांत मोठ्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे," असे आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल आहे.
पुढील २ दिवस पुद्दुचेरी आणि कराईकलमधील शाळांना सुट्टी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाखाली मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी बंद राहतील, असे पुद्दुचेरी सरकारने जाहीर केले आहे. गृहमंत्री ए नमशिवयम यांनी पत्रकारांना सांगितले की, पावसामुळे पुद्दुचेरी आणि कराईकल भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालये शुक्रवारपासून दोन दिवस बंद राहतील. सर्व खाजगी व्यवस्थापित शाळा आणि सरकारी अनुदानित शाळा देखील बंद राहतील.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
दरम्यान, बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाची तीव्रता वाढत असल्याने भारतीय नौदलाने सर्वसमावेशक आपत्ती प्रतिसाद योजना सक्रिय केली आहे. मच्छिमारांना ३१ नोव्हेंबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्लाही अधिकाऱ्यांनी दिला आहे.