फ्रेम कमकुवत असल्याने कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा:राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीचा ठपका

3 hours ago 1
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गंज, कमकुवत फ्रेम व चुकीच्या वेल्डिंगमुळे कोसळल्याचा ठपका चौकशी समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे. या अहवालामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या महिन्यात कोसळला होता. याप्रकरणी सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली होती. तसेच या समितीला ३० दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. या समितीने १६ पानी अहवाल सरकारकडे सादर केला आहे. त्यात हा पुतळा कमकुवत फ्रेम आणि पुतळ्यात गंज चढल्यामुळे कोसळल्याचे म्हटले आहे. भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाचसदस्यीय समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता. अनावरणानंतर ८ महिन्यांतच कोसळला पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या ८ महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांसह शिवप्रेमींचीदेखील माफी मागितली होती. पोलिसांनी या प्रकरणाचे बांधकाम पाहणाऱ्या चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक केली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article