Published on
:
19 Nov 2024, 7:14 pm
Updated on
:
19 Nov 2024, 7:14 pm
छत्रपती संभाजीनगर : बीड बाय पास परिसरातील रेणुका माता मंदिर कमान परिसरात असलेल्या एका सराफा दुकानदाराला दोघांनी पिस्तुलाचा भाग दाखवून लुटले. मंगळवारी १९ नोव्हेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
सुरेश कुलथे यांचे बीड बायपास परिसरातील रेणुका माता मंदिर कामानी जवळ साराफा दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी जात असताना बॅगमध्ये त्यांनी ७० ग्रॅम सोने व ५० हजार रुपये रोख भरले. तेवढेच दुकानांमध्ये दोन जण शरद यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून बॅग हिसकावून दुचाकीवर पोबारा केला.
घटनेची तात्काळ माहिती कुलथे यांनी सातारा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम ताठे हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून याप्रकरणी कुलथे यांच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करत आहेत.