बसच्या सिटाखाली विद्यार्थ्याला सापडले 500 च्या नोटांचे बंडल:दोन दिवसांपूर्वी याच बसमधून ईव्हीएम मशीनची केली होती ने-आण
5 hours ago
1
विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या एक दिवस आधी निवडणूक कामांत वापरण्यात आलेल्या एका बसमधून 500 च्या नोटांचे दोन बंडल सापडली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने प्रमाणिकपणा दाखवत ही रक्कम वाहकाकडे सुपूर्द केली. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. कोपरगाव आगाराची बस एमएच 40 वाय 5679 या क्रमांकाची बस स्ट्रॉंग रूमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रापर्यंत जाऊन आली. त्यानंतर त्याच बसने गुरुवारी वैजापूर कोपरगाव अशा बस फेऱ्या केल्यानंतर संध्याकाळी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथून विद्यार्थ्यांना घेऊन ही बस धामोरीच्या दिशेने जात असताना बसच्या शेवटच्या सीटाखाली प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपयांच्या नोटांचे दोन बंडल मिळून आले. ही रक्कम 86 हजार पाचशे रुपये एवढी असल्याची माहिती आहे. उलट सुलट चर्चांना उधाण विद्यार्थ्यांनी हे पैसे एसटी बसच्या वाहक सविता आडांगळे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर सविता आडांगळे यांनी बस डेपो मॅनेजर अमोल बनकर यांनाही याबाबत माहिती देऊन ती रक्कम बस डेपोत नेऊन जमा केली. प्रशासनाने निवडणूक कामासाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांकडून तपास सुरू एसटी आगार व पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. ही रक्कम नेमकी कोणाची आहे? बसच्या सीटखाली कशी आली? कोणत्या कामासाठी ही रक्कम बसमधून नेण्यात येत होती, याचाही तपास करण्यात येणार आहे. हे ही वाचा... महाराष्ट्रात 'मुख्यमंत्र्यांची खुर्ची' बंडखोरांच्या हाती:भाजप महायुतीच्या 31 जागांवर थेट इम्पॅक्ट; समजून घ्या शिंदे-अजितदादांची आतली खेळी पोल ऑफ पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीचे (भाजप महायुतीचे) सरकार स्थापन होणार आहे. 11 एजन्सीचे एक्झिट पोल महायुतीला सरासरी 146 जागा देत आहेत. महाराष्ट्र विधानसभेत 288 जागा असून बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता आहे. म्हणजे भाजप आघाडी विजयाच्या जनळवर उभी आहे. सविस्तर वाचा... महायुती सत्तेत आल्यास पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री?:शिवसेना नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी; भाजपनेही स्थिती पाहून घेतली लवचिक भूमिका विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आल्यास पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यातच भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी शिंदे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल असे विधान केल्यामुळे भाजपनेही स्थितीनुसार लवचिक भूमिका घेतल्याचा दावा केला जात आहे. सविस्तर वाचा...
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)