बाईक प्रेमींसाठी पर्वणीच; Royal Enfield ची नवी बाईक लवकरच मार्केटमध्ये

5 hours ago 1

Royal Enfield Goan Classic 350: तुम्हाला Royal Enfield घ्यायची आहे का, मग चिंता कसली करताय. आम्ही तुमच्यासाठी Royal Enfield च्या नव्या बाईकची माहिती घेऊन आलो आहोत. हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. Royal Enfield या नव्या बाईकचे लॉन्चिंगपूर्वी फीचर्स समोर आले आहेत. जाणून घ्या.

लडाखच्या मैदानी भागात फिरण्याची मजा Royal Enfield च्या बाईकवर आहे. तोच आनंद आता गोव्याच्या निसर्गसौंदर्याची आणि समुद्रकिनाऱ्याची ताजी हवा घेताना घेता येणार आहे. कारण Royal Enfield ची नवी बाईक येत आहे.

Royal Enfield Goan Classic 350 बाईकचा लूक समोर

Royal Enfield च्या एका नव्या बाईकचा फर्स्ट लूक समोर आला आहे. Royal Enfield Goan Classic 350 लॉन्च होण्याआधी या बाईकची एक झलक समोर आली आहे.

Royal Enfield Goan Classic 350 कधी लॉन्च होणार?

रॉयल एनफिल्ड गोव्यातच Royal Enfield Goan Classic 350 लॉन्च करणार आहे. कंपनी येथे सुरू असलेल्या मोटोव्हर्स 2024 मध्ये 23 नोव्हेंबर रोजी ही बाईक अधिकृतपणे लॉन्च करणार आहे. लॉन्चपूर्वी समोर आलेल्या फर्स्ट लूकवरून Royal Enfield Goan Classic 350 ही बाईक ‘बॉबर स्टाईल’ बाईक असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Royal Enfield Goan Classic 350 चे फीचर्स कोणते?

Royal Enfield Goan Classic 350 बद्दल आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार त्यात एकच सीट लेआऊट आहे. या बॉबर बाईकमध्ये ट्यूबलेस टायरसह स्पोक व्हील्स देण्यात आले आहेत. Royal Enfield Goan Classic 350 या बाईकमध्ये कंपनीने फ्रंटमध्ये ‘Classic 350’ सारखे 19 इंचाचे व्हील ठेवले आहे. लुक वाढवण्यासाठी मागील बाजूस 18 इंचाऐवजी 16 इंचाचे व्हील ठेवण्यात आले आहे.

कमी उंचीच्या लोकांनाही चालवता येणार

Royal Enfield Goan Classic 350 या बाईकमधील सीटची उंची कमी ठेवण्यात आली आहे. यामुळे कमी उंची असलेल्यांनाही ही बाईक सहज चालवता येणार आहे. कंपनीने एलईडी हेडलॅम्प, एलईडी ब्लिंकर, मिनी अॅप हँगर आणि टेल लॅम्प विथ केस देखील दिले आहेत. फ्रंट मडगार्ड छोटा करण्यात आला आहे, तर त्याच्या सायलेन्सरची डिझाइन स्लॅश कट करण्यात आली आहे.

Royal Enfield Goan Classic 350 चे रंग कोणते?

सध्या कंपनीने Royal Enfield Goan Classic 350 ही बाईक तीन रंगांमध्ये लॉन्च केली आहे. यात रॉयल ब्लू आणि मॅट फिनिश ब्लॅक कलर आहे. याचे 349 सीसीइंजिन 20 बीएचपीचा पॉवर आणि 27 न्यूटनचा पीक टॉर्क जनरेट करेल.

Royal Enfield Goan Classic 350 या बाईकमध्ये कंपनीने 5 स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. त्याची ग्राऊंड क्लिअरन्स 170 मिमी आहे. याची अपेक्षित किंमत 2.30 लाख रुपये असू शकते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article