गेल्या सात सत्रांतील घसरणीनंतर आज मंगळवारी (दि.१९) सेन्सेक्स सावरला.(file photo)
Published on
:
19 Nov 2024, 4:50 am
Updated on
:
19 Nov 2024, 4:50 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या सात सत्रांतील घसरणीनंतर आज मंगळवारी (दि.१९) भारतीय शेअर बाजार सावरला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ८३५ अंकांनी म्हणजेच १ टक्के वाढून ७८,१७४ अंकाला स्पर्श केला. तर निफ्टी २५० अंकानी वाढून २३,७०० वर पोहोचला. बाजारातील तेजीत आयटी, ऑटो आणि एनर्जी शेअर्स आघाडीवर आहेत.
मिडकॅप, स्मॉलकॅपमध्ये खरेदी
कार्पोरेट कंपन्यांची कमकुवत कमाई आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या माऱ्यामुळे सोमवारी बीएसई सेन्सेक्सने करेक्शन मोडमध्ये प्रवेश केला होता. आज बाजारातील रिकव्हरी दिसून आली. बीएसई मिडकॅपमध्ये खरेदी दिसून येत आहे. हा निर्देशांक १.३ टक्क्यांनी वाढला आहे. तर स्मॉलकॅप १.६ टक्क्यांनी वाढला आहे.