बार्शिटाकळीत राष्ट्रीय स्मारकालगत प्रतिबंधित जागेवरच बांधकाम सुरू:तक्रार करूनही प्रशासनाची चुप्पी का?, नागरिकांचा सवाल
2 hours ago
2
शहरातील राष्ट्रीय स्मारकाजवळ प्रतिबंध असलेल्या जागेत विनापरवानगी सुरू असलेल्या बांधकामाबद्दल तक्रार करुनही याकडे प्रशासनाच्यावतीने कानाडोळा केला जात असल्याने या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बार्शिटाकळी शहरात भारतीय सर्वेक्षण पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत असलेले कालंका मातेचे हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम केलेले पुरातन मंदिर आहे. या मंदिराला देश विदेशातून भाविक दर्शनाला येत असतात. नवरात्रोत्सव काळात तर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या मंदिरालगतच अतिक्रमण झाल्याची माहिती आहे आणि काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने राष्ट्रीय स्मारकाजवळ नियमानुसार बांधकाम, खोदकाम वा इतरही कार्य करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. तसा फलकसुद्धा लावलेला आहे. राष्ट्रीय स्मारकाच्या देखभालीसाठी नियुक्त असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांने नगर पंचायत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. परंतु नगर पंचायत प्रशासनाच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. आणि विना परवानगी होत असलेल्या प्रतिबंधित जागेवर बांधकाम सुरुच आहे. त्याला केव्हा पायबंद घातल्या जाईल, याकडे गावातील भाविकांचे व सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आली तक्रार राष्ट्रीय स्मारकाच्या लगतच्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणतेही खोदकाम, बांधकाम किंवा अतिक्रमण करता येत नाही. तरीसुद्धा परिसरातील एका नागरिकाने बांधकाम सुरु केले. याबाबतची तक्रार आम्ही वरिष्ठ व स्थानिक नगर पंचायतला दिली आहे. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नाही. - सौरभ यादव, कर्मचारी, राष्ट्रीय स्मारक, कालंका माता मंदिर. प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष बार्शिटाकळी येथील हे राष्ट्रीय स्मारक हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिनस्त आहे. परंतु याबाबत अधीक्षक उपविभागप्रमुख भा.पु.स. अकोला, मुख्याधिकारी न.पं. बार्शीटाकळी व राष्ट्रीय स्मारक येथे कार्यरत कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे प्रकार घडत आहेत. - नरेंद्र पोटेकर, सामाजिक कार्यकर्ते. चौकशी करुन कारवाई याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. मात्र त्यात कुणाचेही नाव नाही. एका व्यक्तीने बांधकाम केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून चुकीचे आढळल्यास नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. - सुनील उगले, कार्यालय अधीक्षक, नगरपंचायत, बार्शिटाकळी.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)