बाेगस मतदान सुरू असल्याचा आरोप करत युगेंद्र पवारांच्या माताेश्री आक्रमक:शर्मिला पवारांना केंद्रात येण्याचा अधिकार नाही, अजित पवार गटाचा दावा

2 days ago 1
बारामतीबारामतीमधील काही मतदार केंद्रांवर बाेगस मतदान हाेत असल्याचा आराेप करत आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या माताेश्री शर्मिला पवार आक्रमक झाल्या. त्यांनी बालक मंदिर मतदान केंद्रावर जाऊन केंद्राची पाहणी करत माध्यमांशी संवाद साधत कार्यकर्त्यांना जिवे मारण्याचे धमकावत असल्याचा आराेप केला. यामुळे तणाव निर्माण झाला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती निवळवली.शर्मिला पवार म्हणाल्या, आमचा कार्यकर्ता माेहसीन यास स्थानिक काही पदाधिकाऱ्यांनी दादागिरी करत ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत आम्ही पोलिसांकडे तक्रार केल्यावर त्यांनी आम्हास मदत केली आहे. घड्याळाचे चिन्ह असलेल्या शिक्का मारलेल्या स्लिप आम्हाला या ठिकाणी मिळाल्या आहेत.अजित पवार गटाचे कार्यकर्ते म्हणाले, शर्मिला पवार यांना मतदार केंद्रात येण्याचा काेणताही अधिकार नाही. मतदान केंद्रात उमेदवार किंवा त्यांचे नाेंदणीकृत निवडणूक प्रतिनिधी केवळ येऊ शकतात. तिसरा माणूस सदर ठिकाणी येऊन आराेप करत आहे. स्वत:च बाहेरून स्लिप घेऊन येतात व बेछूट आराेप केले जात आहेत. विराेधकांची पायाखालची वाळू सरकल्याने ते आराेप करू लागले आहेत. जे बूथ एजंट आमचे आहे त्यांनाच दादागिरी केली जात आहे. आराेप खाेटे अजित पवारउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संबंधित आराेप हा खाेटा आहे. सीसीटीव्ही कॅमेरे मतदान केंद्र परिसरात असून त्याची तपासणी करून पुढील कारवाई करावी. आम्ही इतक्या निवडणुका लढल्या असून असा प्रकार कधी झाला नाही. सुसंस्कृत महाराष्ट्रात राहत असताना शाहू, फुले,आंबेडकर यांची विचारधारा असून माझे कार्यकर्ते असे कधी करणार नाहीत. ज्या पक्षाचे उमेदवार असतात त्या वेळी मतदारांना स्लिप दिली जाते. घरातून मतदान केंद्रात येताना स्लिपचा खालील भाग फाडून आणायचा असताे हे अनेक वर्षे सुरू आहे. तक्रारीत काही तथ्य असेल तर तक्रार करावी, आमच्याच बूथ एजंटला दादागिरी करून बाहेर काढले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article