Sharad Pawar connected Supriya Sule Allegation : बिटकॉईन विकून पैसे निवडणुकीत वापरल्याचा सुप्रिया सुळेंवर आरोप; शरद पवार म्हणाले...
काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीच्या काळात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीत बिटकॉईन विकून पैशांचा वापर केला असल्याचा आरोप सुप्रिया सुळे, नाना पटोले यांच्यावर करण्यात आला आहे. माजी आयपीएस अधिकारी रविंद्रनाथ पाटील यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.