बिहारमध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घ्या; महाराष्ट्रातील मतांच्या घोळावरून लालू प्रसाद यादव यांची मोठी मागणी

2 hours ago 1

lalu prasad yadav

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. पण सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप होतोय. मतं वाढवल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी मोठी मागणी केली आहे. बिहारमध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घ्या, अशी मागणी लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.

दिल्लीत एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना लालू प्रसाद यादव म्हणाले की, पुढच्या वर्षी बिहारमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा विजय होईल. आम्हाला बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक ही मतपत्रिकेवर घ्यावी, अशी मागणीही लालू प्रसाद यादव यांनी केली.

#WATCH | Delhi: Former Bihar CM and RJD chief Lalu Yadav says, “Our party will win the Bihar elections to be held next year. We will get the majority…”

On EVMs, he says, ‘Yes, it (elections) should be conducted using ballot papers.” pic.twitter.com/FKcySsvQuI

— ANI (@ANI) November 29, 2024

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article