७ हजाराची लाच घेणार्या तलाठ्यास रंगेहाथ अटक केलीFile Photo
Published on
:
27 Sep 2024, 5:52 pm
Updated on
:
27 Sep 2024, 5:52 pm
बीड : दारुबंदी विभाग व गेवराई पोलिस ठाण्याकडून दाखल गुन्ह्यात उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने नोटीस बजावली होती. त्या अनुषंगाने बंधपत्र लिहून घेण्यासाठी व सदर प्रकरण बंद करण्यासाठी ७ हजाराची लाच घेणार्या तलाठ्यास छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.२७) बीड येथील उपविभागीय कार्यालयात केली. निलेश मेश्राम असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदार यांचे गेवराई हद्दीत राक्षसभुवन रोडवर जय हिंद नावाचे हॉटेल असून सदर हॉटेलवर दारूबंदी विभागाकडून व गेवराई पोलीस ठाण्याकडून दोन गुन्हे दाखल होते. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी त्यांना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड येथून प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीसच्या अनुषंगाने बंधपत्र लिहून घेण्यासाठी व सदर प्रकरण बंद करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मेश्राम याने दोन हजार रुपये व उप विभागीय दंडाधिकारी मॅडम यांच्यासाठी पाच हजार रुपये अशी एकूण सात हजाराच्या लाचेची मागणी केली होती. आज (शुक्रवारी) कार्यालर्यात पंचासमक्ष लाच स्विकारताना त्याला लाचलुचपत रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक हरिदास डोळे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.