Published on
:
23 Nov 2024, 8:22 am
Updated on
:
23 Nov 2024, 8:22 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Jasprit Bumrah Perth Test : पर्थ कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने धडाकेबाज कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. भारताने पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा बुमराहने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने यजमानांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. बुमराहने 5 विकेट घेत कपिल देव यांचा विक्रम मोडला. बुमराह SENA देशांमध्ये सर्वात कमी डावात सर्वाधिक वेळा 5 बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने SENA देशांमध्ये केवळ 51 डावांत गोलंदाजी करताना 7 वेळा 5 विकेट घेण्याचा पराक्रम नोंदवला आहे. कपिल देव हे SENA देशांमध्ये 62 डावांमध्ये 7 वेळा 5 विकेट घेण्यात यशस्वी ठरले होते.
बुमराहने आपल्या कसोटी कारकिर्दीत 11व्यांदा 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. तर त्याने तो दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 बळी घेण्यात यशस्वी झाला आहे. मोठी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत त्याने त्यांच्याच भूमीवर 5 बळी घेतले आहेत. यासह ऑस्ट्रेलिया आता पाचवा देश बनला आहे जिथे बुमराहने 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा 5 बळी घेतले आहेत.
बुमराहने दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक 3 वेळा 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याच वेळी, त्याने भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये प्रत्येकी 2 वेळा 5 प्लस विकेट घेतल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये 5 बळी घेणारे भारतीय कर्णधार
8 वेळा : बिशनसिंग बेदी
4 वेळा : कपिल देव
2 वेळा : अनिल कुंबळे
1 वेळ : विनू मंकड
1 वेळ : जसप्रीत बुमराह
इतकेच नाही तर बुमराह विदेशी भूमीवर कसोटी खेळताना पाच बळी घेणारा संयुक्तपणे भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने टीम इंडियाच्या इशांत शर्माची बरोबरी केली आहे. माजी कर्णधार कपिल देव पहिल्या क्रमांकावर आहेत.
बुमराहची इशांत शर्माशी बरोबरी
12 वेळा 5 बळी - कपिल देव
10 वेळा 5 बळी - अनिल कुंबळे
9 वेळा 5 बळी - जसप्रीत बुमराह
9 वेळा 5 बळी - इशांत शर्मा
बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच बळी घेण्याच्या बाबतीत माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि इशांत शर्मा यांची बरोबरी केली आहे. या तीन वेगवान गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये अनुक्रमे 11-11 वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारे वेगवान गोलंदाज
23 वेळा : कपिल देव : 131 कसोटी
11 वेळा : जसप्रीत बुमराह : 41 कसोटी
11 वेळा : झहीर खान : 92 कसोटी
11 वेळा : इशांत शर्मा : 105 कसोटी
10 वेळा : जवागल श्रीनाथ : 67 कसोटी
याशिवाय सेना देशांमध्ये खेळताना बुमराह आशियाई देशांमधून सर्वोत्तम कसोटी गोलंदाजीच्या सरासरीच्या बाबतीत पहिला आला आहे. एका विशिष्ट बाबतीत त्याने वसीम अक्रमचा पराभव केला आहे.
बुमराहची SENA देशांविरुद्धची कामगिरी
22.63 : जसप्रीत बुमराह
24.11 : वसीम अक्रम
25.02 : मोहम्मद आसिफ
26.55 : इम्रान खान
26.69 : मुरलीधरन
SENA देशांमध्ये खेळताना आशियाई गोलंदाजांमध्ये सर्वाधिक पाच बळी घेण्याच्या बाबतीत बुमराहने अव्वल 5 मध्ये एन्ट्री घेतली आहे. वसीम अक्रमचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
बुमराहने वसीम अक्रमचा विक्रम मोडला
बुमराह SENA देशांमधील आशियाई गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम कसोटी गोलंदाजीच्या सरासरीच्या बाबतीत अव्वल स्तानी पोहचला आहे. याबाबतीत त्याने वसीम अक्रमचा विक्रम मोडीत काढला आहे.
SENA देशांमध्ये आशियाई गोलंदाजांची सर्वोत्तम कसोटी गोलंदाजी सरासरी (किमान 50 विकेट)
22.63 : जसप्रीत बुमराह*
24.11 : वसीम अक्रम
25.02 : मोहम्मद आसिफ
26.55 : इम्रान खान
26.69 : मुरलीधरन
SENA देशांमध्ये सर्वाधिक वेळा 5 बळी घेणारे आशियाई गोलंदाज
11 : वसीम अक्रम
10 : मुथय्या मुरलीधरन
8 : इम्रान खान
7 : कपिल देव
7 : जसप्रीत बुमराह*
बुमराहचा करिष्मा केवळ 10.1 षटकात 5 विकेट्स
पर्थ कसोटी सामन्यात बुमराहने केवळ 10.1 षटकात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. याआधी बुमराहने 2019 मध्ये जमैका येथे वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ 5.5 षटकांत 5 विकेट घेतल्या होत्या. भारतासाठी कसोटीत सर्वात जलद 5 बळी घेण्याचा विक्रम हरभजन सिंगच्या नावावर आहे. त्याने 2006 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 4.3 षटकात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला होता.
याशिवाय ऑस्ट्रेलियात भारतीय गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट घेणारा बुमराह चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याने याबाबतीत माजी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचा विक्रम मोडीत काढला आहे. बेदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एकूण 35 विकेट घेतल्या होत्या. बुमराहच्या नावावर आता 37 विकेट्स झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कपिल देव यांनी सर्वाधिक 51 विकेट घेतल्या आहेत.
अशी कामगिरी करणारा तिसरा कर्णधार
पर्थच्या मैदानावर विकेट घेणारा बुमराह तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्या आधी असा पराक्रम बिशनसिंग बेदी, अनिल कुंबळे यांनी केला होता.
यासोबतच बुमराह ऑस्ट्रेलियात एकापेक्षा जस्तवेळा 5 हून अधिक बळी घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कपिल देव, मोहम्मद शमी आणि आता जसप्रीत बुमराह यांनी ऑस्ट्रेलियात एकापेक्षा जास्त वेळा 5 बळी मिळवण्यात यश मिळवले आहे.
कसोटीत भारताच्या या वेगवान गोलंदाजांसाठी घेतले सर्वाधिक वेळा 5+ विकेट्स
23 : कपिल देव (131 कसोटी)
11 : जसप्रीत बुमराह (41 कसोटी)
11 : झहीर खान (92 कसोटी)
11 : इशांत शर्मा (105 कसोटी)
10 : जवागल श्रीनाथ (67 कसोटी)
यासह बुमराह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 50 विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा भारताचा एकमेव वेगवान गोलंदाज ठरला आहे.
WTC च्या एकाच आवृत्तीत भारतासाठी सर्वाधिक बळी
रविचंद्रन अश्विन (2019-21) – 71
रविचंद्रन अश्विन (2023-25) – 62
रविचंद्रन अश्विन (2021-23) – 61
रवींद्र जडेजा (2021-23) – 51
जसप्रीत बुमराह (2023-25) – 50*