बुलढाण्यात महाशक्ती स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला file photo
Published on
:
20 Nov 2024, 5:16 am
Updated on
:
20 Nov 2024, 5:16 am
बुलढाणा : राज्यात विधानसभेसाठी आज मतदान होत असताना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जळगाव जामोद मतदार संघातील परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. शेगांव मार्गावर ही घटना घडली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले आहे.
विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हा भ्याड हल्ला केल्याचा आरोप डिक्कर यांच्या समर्थकांनी केला आहे. जळगाव जामोद मतदार संघात एकूण ९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. डिक्कर यांच्या प्रचारासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी तीन सभा घेतल्या होत्या. डिक्कर यांची उमेदवारी चांगलीच चर्चेत होती. मतदाना दिवशीच त्यांच्यावर हल्ला झाल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.