कल्पना लमाणीPudhari File Photo
Published on
:
19 Nov 2024, 11:55 pm
Updated on
:
19 Nov 2024, 11:55 pm
बेळगाव : प्रसूतीसाठी दाखल झालेल्या बाळंतिणीचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला. येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचे सांगत अधिकार्यांना धारेवर धरले. बिम्सचे संचालक डॉक्टर अशोककुमार शेट्टी यांनी सखोल चौकशी करण्याची ग्वाही दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले. बिम्ससमोर रात्री गर्दी जमल्याने पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.
सौंदत्ती तालुक्यातील हलकी तांडा येथील कल्पना लमाणी (वय 29) ही महिला बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. मंगळवारी दुपारी ती प्रसूत झाली डॉक्टरांनी बाळ व बाळंतीण सुखरूप असल्याचेही सांगितले. परंतु, सायंकाळी अचानक तिचा मृत्यू झाला. सर्व व्यवस्थित असतानाही मृत्यू कसा झाला, असे म्हणत नातेवाईकांनी डॉक्टरांना धारेवर धरले. यावेळी डॉक्टरांनी रक्तदाब कमी झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण सांगितले. परंतु ते कारण न पटल्याने नातेवाईक अधिकच आक्रमक झाले. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे कल्पनाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सखोल चौकशी करण्याची ग्वाही संचालक डॉ. शेट्टी यांनी दिली आहे.