भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेचा थरार 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. File Photo
Published on
:
19 Nov 2024, 1:57 pm
Updated on
:
19 Nov 2024, 1:57 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : Border-Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेचा थरार 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. बीजीटीमधील पहिला सामना पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बीजीटीमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या कर्णधारांबद्दल जाणून घेऊया.
कर्णधार म्हणून रिकी पाँटिंगने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 2 शतके झळकावली आहेत. त्याने 2008 मध्ये ॲडलेडमध्ये 140 धावांची इनिंग खेळली होती. तर त्याच वर्षी पाँटिंगने बंगळुरू कसोटीत शानदार 123 धावा फटकावल्या होत्या.
रिकी पाँटिंगप्रमाणेच स्टीव्ह वॉनेही बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कर्णधार म्हणून 2 शतके झळकावण्याचा पराक्रम केला. त्याने 1999 मध्ये ॲडलेड येथे 150 धावांची इनिंग खेळली होती. तर 2001 मध्ये कोलकातामधील इडन गार्डन्सवर 110 केल्या होत्या.
भारतीय कर्णधार म्हणून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके विराट कोहलीच्या नावावर आहेत. त्याने 4 शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. त्याची ही 4 शतके सिडनी (2015), ॲडलेड (2014 आणि 2018) आणि पर्थ (2018) येथे झळकली.
कोहलीप्रमाणेच मायकेल क्लार्कच्याही नावावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कर्णधार म्हणून 4 शतके आहेत. त्याने 2012 मध्ये ॲडलेडमध्ये शतक झळकावले आणि त्यानंतर त्याच वर्षी सिडनीमध्ये त्रिशतक झळकावले. यानंतर 2013 मध्ये त्याने चेन्नई आणि 2014 मध्ये ॲडलेडमध्ये शतकी खेळी साकारली.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम स्टीव्ह स्मिथच्या नावावर आहे. स्टीव्ह स्मिथने कर्णधार म्हणून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 6 शतके झळकावली आहेत. यावेळीही स्मिथला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल.