बोरगाव मंजू परिसरात 9 हजार 854 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
2 days ago
1
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघांत सर्वात मोठा भाग असलेल्या बोरगाव मंजू येथे १८ मतदान बुथ होते. १५ हजार ५८५ पैकी ९ हजार ८५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीत ६३.२२ टक्के मतदान झाले होते. ही मतदानाची टक्केवारी पाहता विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढावी, यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिम राबवली. मात्र, मतदारांनी या निवडणुकीतही फारसा प्रतिसाद दिला नाही. काही ठिकाणी मतदारांनी रांगा मात्र लावल्या होत्या. विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच सर्व राजकीय पक्षाचे प्रमुखांसह कार्यकर्ते कामाला लागले. मतदानासाठी सकाळी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. दुपारी मतदान केंद्रावर तुरळक मतदान झाले. दुपार नंतर मतदानाचा प्रतिसाद मिळाला. बेरोजगारी, शेतीचे प्रश्न, वाढती महागाई हे मुद्दे प्रभावी ठरल्याचे दिसून आले. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. येथे झाले मतदान ः निवडणूक विभागाने येथील १७ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था केली. यात परशुराम नाईक विद्यालय, येथील पाच बुथ, जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक १ आठवडी बाजार पाच बुथ, जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक दोन चार बुथवर, उर्दू शाळा क्रमांक एक दोन बुथ असे होते. निवडणुक शांततेत पार पडावे यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, यांनी मतदान दरम्यान भेट देऊन आढावा घेतला. बोरगाव मंजूचे ठाणेदार अनिल गोपाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)