ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबला अन् कार आठ दुचाकींना धडकली

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

29 Sep 2024, 7:26 am

Updated on

29 Sep 2024, 7:26 am

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय पडल्याने निराला बाजारातील एचडीएफसी बँकेसमोरून भरधाव निघालेली बाजूलाच असलेल्या पार्किंगमधील दुचाकीवर जाऊन धडकली. यात सुमारे आठ दुचाकी व एका चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी (दि. २८) दुपारी घडली. या विचित्र अपघातात ४ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

शहराच्या निराला बाजार भागातील पर्ल हॉटेल समोर गाड्या पार्किंग करण्यात येतात. दुपारी दोन वाजेच्या सुमारास एचडीएफसी बँकसमोरून कार (एमएच-२१-एएक्स-१४१८) ही निरालाबाजार चौकाकडे जात होती. पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेताना त्या कारचालकाने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबले. आणि ही कार भरधाव समोरच असलेल्या पार्किंगमध्ये घुसली.

त्याचदरम्याने निराला बाजार चौकाकडून एचडीएफसी बँकेकडे जाणारा स्कूटी चालक उंच उडून खाली पडला. तर पार्किंगमध्य थांबलेला दुचाकी चालक थोडक्यात बचावला. या अपघातात चारचाकी (क्र. एमएच- २०-बीएच-९५४८) गाडीचे देखील नुकसान झाले आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

कारचालक महिला

एका थरारक अपघातातप्रकरणी कारचालक ही महिला होती आणि घटना घडताच ती गाडीतून पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनीने सांगितले. कारने सात ते आठ दुचाकीला धडक दिल्यानंतर थांबल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान या प्रकरणी वृत्त देईपर्यंत कोणीच तक्रार देण्यासाठी आले नसल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article