Published on
:
29 Nov 2024, 12:57 pm
Updated on
:
29 Nov 2024, 12:57 pm
भंडारा: आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगामाकरिता धान खरेदीसाठी शासनाचे पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान विक्री करता यावा, यासाठी जिल्ह्यातील २१० खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदरील सर्व केंद्रावर शेतकरी नोंदणी आणि धान खरेदीचे कामकाज सुरू आहे.
परंतु, जिल्ह्यातील काही सेंटर शेतकरी नोंदणी करिता पैसे घेत असल्याबाबत तक्रारी होत्या. नाकाडोंगरी येथील चंद्रकांत व्यंकटराव गजभिये यांनी रज्जत सुशिक्षित बेरोजगार सेवा सह संस्था मर्या आष्टी ता. तुमसर, जि. भंडारा या खरेदी केंद्राविरुध्द नोंदणी करिता पैसे घेत असल्याबाबत तक्रार जिल्हा पणन कार्यालयास दिली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सदर संस्थेची आयडी बंद करण्यात आली आहे.
तक्रारीस अनुसरून सहाय्यक जिल्हा पणन पणन अधिकारी आर.पी. सोनवणे व कायदा विषयक सल्लागार राकेश शिंदेगणशूर यांनी संबंधित सेंटरची चौकशी करून जिल्हा पणन कार्यालयास अहवाल सादर केला. सदर अहवालातील नमूद अनियमिततेबाबत जिल्हा पणन अधिकारी यांनी शासन निर्णयाच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून आणि मार्गदर्शक सुचनेतील तरतुदीनुसार, कडक धोरण अवलंबिले असून या सेंटरचा आय.डी. बंद केला आहे.