भाजपच्या चरण ठाकूरांनी ३० वर्षांनंतर काटोलमधील देशमुखी आणली संपुष्टात:सलील देशमुखांना वडिलांवरील हल्लाही वाचवू शकला नाही
2 hours ago
1
१९९५ पासून काटोल विधानसभा मतदारसंघ आणि अनिल देशमुख असे समीकरणच झाले होते. फक्त २०१४ मध्ये अनिल देशमुख यांचा त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी पराभव केला होता. मात्र मतदारसंघावर राज्य देशमुख यांचेच होते. यावेळी मात्र देशमुखीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे चरणसिंग ठाकूर यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांचा पराभव केला आहे. ११ व्या फेरी नंतर चरणसिंग ठाकूर हे ३० हजार मतांच्या आघाडीवर आहे. ही आघाडी आता भरून निघणे अवघड आहे. त्यामुळे कमळाने मतदारसंघात जल्लोष सुरू केला आहे. अनिल देशमुख १९९५ मध्ये सर्वप्रथम अपक्ष म्हणून निवडून आले होते. युती सरकारमध्ये ते मंत्री झाले. त्यानंतरत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. तेव्हापासून ते सातत्याने मंत्री आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळत ते गृहमंत्री होते. ते पुन्हा लढतील आणि निवडून येतील अशीच अपेक्षा सर्वांना होती. मात्र मुलाच्या हट्टामुळे त्यांनी आपला एबी फॉर्म सलील देशमुख यांना दिला. येथेच त्यांचा घात झाल्याचे बोलले जात आहे. चरणसिंग ठाकूर आणि अनिल देशमुख यांच्यात २०१९ मध्ये सामना झाला होता. ही निवडणूक देशमुख यांनी सुमारे १७ हजार मतांनी जिंकली होती. गृहमंत्री असताना देशमुख यांना तुरुगांत टाकण्यात आले होते. ते १४ महिने तुरुंगात होते. त्यामुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी सहानुभूती होती. सलील देशमुख यांच्या प्रचारा दरम्यान त्यांच्या गाडीवर दडफेक झाली होती. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. ही घटनाही सलील देशमुख यांना वाचवू शकली नाही. काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत भाजपा दुसऱ्यांदा निवडून आली आहे. काटोल विधानसभा एकूण मतदान : ६९.९४ टक्के पुरुष : ७१.७१ टक्के| महिला : ६८.१३ टक्के १ लाख ४२ हजार ६२३ पुरुष मतदारांपैकी १ लाख २ हजार २७८ जणांनी तर १ लाख ३८ हजार ७३८ महिलांपैकी ९४ हजार ५२३ मतदान केले. एकूण मतदार : २ लाख ८१ हजार ३६७ पैकी १ लाख ९६ हजार ८०१ मतदारांनी मतदान केले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)