यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होत आहे. आज महाराष्ट्रात मतदान पार पडत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात 288 मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. या 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होत आहे. आज महाराष्ट्रात मतदान पार पडत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे. मतदानाला सुरुवात होताच महाराष्ट्रातील बहुतांश उमेदवारांनी देवदर्शन करत मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी त्यांचे कुटुंबाकडून औक्षणही करण्यात आले.
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एनसी यांनी मतदानापूर्वी मुंबादेवीचे दर्शन घेतलं आहे. शायना एनसी या शिवसेना शिंदे गटाकडून मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार आहेत. मतदानापूर्वी शायना एनसींकडून मुंबादेवी चरणी प्रार्थना करण्यात आली. तर दुसरीकडे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाला जाण्यापूर्वी अजय चौधरी यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. त्यासोबतच मुंबईतील माहीम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत यांचं पत्नीकडून औक्षण करण्यात आले. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी महेश सावंत यांचे औक्षण करण्यात आले. त्यासोबत महेश सावंत यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
बातमी अपडेट होत आहे….