मतदान महाराष्ट्राने केले की ईव्हीएमने?:अपेक्षित निकाल आले नाही, आदित्य ठाकरेंनी प्रक्रियेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

2 hours ago 1
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून कोणाची सत्ता येणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीकडून विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. या दरम्यान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुकीत अपेक्षित असे निकाल आले नाही. महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले की ईव्हीएमने मतदान केले, हा मोठा प्रश्न आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हाला लोकसभा निवडणुकीत याच महाराष्ट्राने आशीर्वाद दिले. संपूर्ण महाराष्ट्रात जनता महाविकास आघाडीसोबत असल्याची लाट दिसत होती. पण जे निकाल सर्वांना अपेक्षित होते, ते आले नाही. यंदाच्या निवडणुकीत ईव्हीएमने किती प्रचार केला हे पहावे लागेल. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मतदान केले की ईव्हीएमने मतदान केले, हा मोठा प्रश्न आहे. निकालावर लवकरच सविस्तर बोलू आदित्य ठाकरे म्हणाले, निष्ठावंत म्हणून जिथे काम केले तिथे विजय झाला आहे. पण महाराष्ट्रातील आलेला निकाल पाहता, आपल्याला अपेक्षित असे निकाल आलेले नाहीत. आता निकालाचा आढावा घेत असून त्यावर लवकरच बोलू. या सगळ्यावर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेतील. खात्री असलेल्या ठिकाणीही अनपेक्षित निकाल आले काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या पराभवावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ज्या ठिकाणी लोक आपल्यासोबत आहे, असे शंभर टक्के वाटत होते, तिथेही पराभव झाला. तेथील असा निकाल तरी अपेक्षित नव्हता. त्यामुळे या सर्वांवर टेक्निकल चर्चा होणे गरजेचे आहे. आदित्य ठाकरे वरळीमधून विजयी दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातून विजय झाला आहे. त्यांना जवळपास 61 हजार मते मिळाली आहेत. तर शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांना 52 हजार 198 मते मिळाली आहे. या मतदारसंघात संदीप देशपांडे यांना देखील मनसेने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांना केवळ 18 हजार मते मिळाली आहेत. हे ही वाचा... काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पराभव:बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरेंसह यशोमती ठाकुर यांना मतदारांचा धक्का बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा काँग्रेसच्या दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला आहे. राज्यात आमचीच सत्ता येईल, तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वत:चाच मतदार संघ वाचवू शकले नाहीत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचा हा मोठा पराभव मानला जात आहे. सविस्तर वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article