मतदान संपताच देवेंद्र फडणवीसांनी गाठले संघ मुख्यालय:राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण
2 days ago
1
संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. येत्या २३ रोजी मतमोजणी आहे. मतमोजणीनंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मतदान संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्याने चर्चेचे पेव फुटले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत संघाने केलेल्या सक्रिय मदतीमुळे मतदानाचा टक्का वाढला. त्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणुकांची रणधुमाळी संपताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळी संघ मुख्यालयाला भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी पंधरा ते विस मिनिटे चर्चा केल्याचीही माहिती पुढे आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केल्यानंतर दिवसभर नागपुरातील वेगवेगळ्या बूथवर जावून भाजप कार्यकर्त्यांची भेट घेवून माहिती घेतली. संध्याकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर फडणवीस अचानक संघ मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. सुमारे १५ ते २० मिनिटे फडणवीस संघ मुख्यालयात होते. विधानसभा निवडणुकीत संघाने नियोजनबद्ध प्रचार केला. भाजपाला बुथनिहाय समन्वयक दिले. तसेच स्वयंसेवकांनी सामाजिक समतोल साधीत घटना बदलण्याच्या नॅरेटीव्हची धार बोथट केली. परिणामी मतटक्का वाढला. त्याचा फायदा भाजपासह महायुतीला होणार आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही सदिच्छा भेट होती असे सूत्रांनी सांगितले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)