मतदान केंद्रात अनुचित प्रकार घडू नये, गोपनीयतेचा भंग होऊ नये यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये. तसेच केंद्राध्यक्ष, अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांनी मतदारांना आवाहन केले आहे.
निवडणूक प्रक्रियेमध्ये समावेश असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना भ्रमणध्वनी वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. सोमवार (दि. 18) सायंकाळी 6 नंतर सायलेंट पिरेड सुरू होत असून, मतदान पार पडेपर्यंत टीव्ही, केबल, नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडियाद्वारे मतदार तसेच निकालावर परिणाम करू शकणार्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाची मनाई आहे.
राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सभा, मिरवणुका यावरही बंदी आहे. अशा बाबी निदर्शनास आल्या, तर त्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल तसेच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी लांडगे यांनी सांगितले.