Published on
:
23 Nov 2024, 10:49 am
Updated on
:
23 Nov 2024, 10:49 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीच्या 200 हून अधिक जागा आघाडीवर आहेत. तसेच महाविकास आघाडी पिछाडीवर आहे. पुढच्या काही तासांमध्ये निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. भाजपा हा 127 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिंदे सेना 56 आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी 38 जागांवर पुढे आहे. एक्झिट पोलने महायुतीला जो कौल दिला होता. त्यापेक्षा रेकॉर्डब्रेक आघाडी महायुतीने मिळवली आहे.
ठाकरे घराण्यातील रक्ताचा वारास नाकारला
दरम्यान, राज्यात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांच्या नावाचा समावेश आहे. माहिम विधानसभा मतदारसंघ हा मुंबईसह राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ होता. माहिममध्ये ठाकरे गट शिवसेनेकडून महेश सावंत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि मनसेकडून अमित ठाकरे यांच्यात तिरंगी लढत रंगली होती. या तिन्ही उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर होणार असेच चित्र सुरूवातीपासून होते. मात्र मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वादातून ठाकरे गटाच्या उमेदवाराने बाजू मारली. ठाकरे शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी पहिल्यापासून लीड कायम ठेवली. अखेर निकाला लागला तेव्हा शिवसेनेचे सदा सरवणकर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर त्या खालोखाल अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर होते.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे ते विजयाचा गुलाल उधणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र निकाल समोर येताच राज ठाकरे यांचे पुत्र यांना मोठा धक्का बसला. अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला.