मतदारांपुढे महायुती नतमस्तक:एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस- अजित पवारांची निकालावर एकत्रित प्रतिक्रिया, आघाडीला प्रत्युत्तर

3 hours ago 1
विधानसभेत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. आतापर्यंतच्या अनेक वर्षांचा निवडणुका आपण पाहिल्या मात्र अशा पद्धतीने लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आपण पाहिली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणी असेल, लाडके भाऊ असतील किंवा लाडके शेतकरी असतील या सर्वांनी महायुतीवर मनापासून प्रेम दाखवले आहे. त्या सर्वांचे आभार देखील शिंदे यांनी मानले आहे. या ऐतिहासिक विषयासाठी सर्वांना दंडवत घातला पाहिजे, अशा शब्दात मतदारांचे आभार देखील शिंदे यांनी मानले. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे अभार मानले. मागील दोन ते सव्वा दोन वर्षात या राज्यांमध्ये जे काम केले, त्या सर्व कामाची ही पोचपावती असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आम्ही जे ऐतिहासिक निर्णय घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती असे निर्णय होते. आम्ही एकीकडे विकास केला. यात महाविकास आघाडीने जी सर्व कामे थांबवली होती ती सर्व कामे सुरू केली असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article