एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये काही प्रकारचे हार्मोन्स बिघडत असतात त्यामुळे त्यांच्यात मानसिक समस्या अधिक उद्भवतात. काही लोकं असे असतात, ज्यांना मधुमेह झाल्यानंतर इतर आजार होण्याची भीती असते. या रुग्णांना त्यांच्या आहारात बराच बदल करावा लागतो. त्यांना बर्याच काही गोष्टी खाणे टाळावे लागते. त्यामुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या भीतीमुळे चिंता निर्माण होते. या रुग्णांनी सतत जर चिंता करत राहिल्यास त्यांच्यामध्ये नैराश्याचे कारण बनते. ‘द लॅन्सेट’च्या अभ्यासानुसार, साखरेची पातळी वाढण्याचा परिणाम शरीराच्या प्रत्येक भागावर होतो. त्याचा मेंदू, फुफ्फुस, हृदयावर परिणाम होत असतो. जेव्हा त्याचा परिणाम मेंदूवर जास्त होतो, तेव्हा या लोकांचे मानसिक आरोग्य बिघडवू शकतो. दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातील मेडिसिन विभागातील डॉ. अजित कुमार सांगतात की, साखरेची वाढलेली पातळी मानसिक आरोग्य बिघडते. जर शरीरातील साखरेची पातळी जास्त काळ वाढलेली राहिली तर मेंदूमध्ये असलेल्या न्यूरोट्रांसमीटरचे संतुलन बिघडू शकते. यामुळे मानसिक आरोग्यही बिघडते. मधुमेहामध्ये ऑक्सिडेटिव्ह तणावाची पातळी देखील वाढते. यामुळे चिंता आणि नैराश्य देखील उद्भवू शकते. डॉ. कुमार म्हणतात की, जगभरात मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकसंख्येपैकी 30 टक्के लोकांना मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार, 2022 मध्ये भारतात मधुमेहाच्या रुग्णांची सर्वाधिक संख्या नोंदली गेली, जी जगातील 828 दशलक्ष प्रकरणांपैकी एक चतुर्थांश असल्याचं सांगितले आहे.
मधुमेहाचा मानसिक आरोग्यावरही परिणाम
3 days ago
2
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- मधुमेहाचा मानसिक आरोग्यावरही परिणाम
Related
रोहित पाटीलच तासगाव - कवठेमहांकाळचा दादा
18 minutes ago
0
संजय बनसोडे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय
2 hours ago
0
सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयी
2 hours ago
1
शिरोली पुलाची येथे पुर्ववैमनस्यातून दोन चार चाकी फोडल्या
2 hours ago
1
मुश्रिफच ठरले 'कागलचे किंग'
3 hours ago
1
यवतमाळ जिल्ह्यात महायुतीचाच बोलबाला
3 hours ago
1
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT