Indapur News: निवडणूक आयोगाकडे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांना दिल्याने इंदापूर पोलीस ठाण्यात बावडा (ता. इंदापूर) येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दशरथ घोगरे व दादासाहेब घोगरे (रा. बावडा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह अरुणराव पाटील यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित दोघा जणांनी निवडणूक आयोगाकडे व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार का दिली असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशा आशयाची फिर्याद पाटील यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी (दि. 21) मयूरसिंह पाटील यांच्यावर हल्ला व जिवे मारण्याचे धमकी दिल्याची वार्ता इंदापूर तालुक्यात पसरली होती. परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण माने, शरद चितारे, बाबसाहेब चवरे आदीनी याबाबत पोलिसांना निवेदन देत कारवाईची मागणी केली.