मराठवाड्यात चालली नाही मनोज जरांगे फॅक्टरची जादू:46 पैकी 36 जागांवर महायुतीचा विजय, आता मराठा आरक्षणाचे काय होणार?

3 hours ago 1
विधानसभा निवडणुकीचा निकाला लागत असून चित्र आता स्पष्ट होत आहे. राज्यातच नव्हे तर मराठवाड्यातही महायुतीच्या पारड्यात मतदारांनी भरघोस मतदान केल्याचे दिसले असून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम राज्यातच नाही तर मराठवाड्यात देखील दिसला नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. मराठवाड्यातील 46 जागांपैकी 36 जागांवर महायुतीने विजय मिळवला असून महाविकास आघाडीला केवळ 8 जागांवरच समाधान मानावे लागले. लवकरच सर्व चित्र स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. महायुतीला अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर भाजपा, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मनोज जरांगे पाटील यांची टीका सुरू होती. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढण्याची घोषणा करत माघार घेतली होती. मनोज जरांगे समाज बांधवांना आवाहन दरम्यान, मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मराठा समाजाने आता आपल्या सामूहिक आमरण उपोषणाच्या तयारीला लागावे, असे आवाहन समाज बांधवांना केले. विधानसभा निवडणुकीत सत्ता कुणाचीही आली तरी आरक्षणासाठी मला लढा द्यावाच लागेल. नवे मंत्री झालेल्यांना 8 दिवस आनंद घेऊ देणार. त्यानंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार. आंतरवाली सराटीमध्ये जिकडे जागा मिळेल तिकडे उपोषण करण्यात येईल. जागा नसेल तर प्रसंगी आंदोलक रस्त्यावर बसतील, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले होते. हे ही वाचा... रावसाहेब दानवेंचा आनंद द्विगुणीत:भोकरदनमधून मुलगा, तर कन्नडमधून मुलगी विजयी; उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा भोकरदन विधानसभा मतदारसंघातून मुलगा संतोष दानवे कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना संजना जाधव विजयी झाल्या. राज्यात ज्या दोन नेत्यांचे दोन्हीही मुले विजयी झाले. मुलगा संतोष दानवे यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघातून जोरदार विजय मिळवून हॅट्रिक केली. तर पहिल्याच वेळेस कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तिकीट घेऊन रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना हर्षवर्धन जाधव यांनीही मोठा विजय मिळवला आहे. सविस्तर वाचा... काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पराभव:बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरेंसह यशोमती ठाकूर यांना मतदारांचा धक्का बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा काँग्रेसच्या दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला आहे. राज्यात आमचीच सत्ता येईल, तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वत:चाच मतदार संघ वाचवू शकले नाहीत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचा हा मोठा पराभव मानला जात आहे. सविस्तर वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article