मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरले असून त्यांनी शनिवारपासून पुन्हा उपोषणाचे अस्त्र उपसलं. उपोषणाला सुरूवात करताना त्यांनी महायुती सरकारवर चांगेलच खडेबोल सुनावले. तसेच गेल्या दीड वर्षांचा लेखाजोखा मांडत त्यांनी संताप व्यक्त केला. मनोज जरांगे पुन्हा एकदातुम्हाला माहित आहे का आंतरवाली सराटीत आमरण उपोषणासाठी बसले असून त्यांनी अनेक मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. मनोज जरांगे यांनी याआधीही अनेक वेळा उपोषण करत सरकारला धारेवर धरले होते. पण मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत किती वेळा आणि कुठे उपोषण केले आहे ते तुम्हाला माहीत आहे का ?
29 ऑगस्ट 2023 ला पहिलं उपोषण
मराठा लोकांच्या समस्या लक्षात घेता मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2023 ला पहिले उपोषण सुरू केलं. 14सप्टेंबर 2023 पर्यंत एकूण 17 दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांचं उपोषण सुरू होतं. या उपोषणाला सकल मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना साथ दिली होती. यानंतर 14 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेची भेट घेऊन हे उपोषण सोडवले. त्यावेली जरांगे यांनी सरकारला आश्वासन पूर्ण करण्यासाठी 45 दिवसाची मुदत दिली. तसेच दिलेल्या मुदतीच्या आत जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा दुसरं उपोषण करू याकरिता जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे राज्यातील मराठा समाजाची जाहीर सभा घेतली होती.
25 ऑक्टोबर 2023 ते 02 नोव्हेंबर दुसरं उपोषण
त्यानंतर मनोज जरांगे यांनी 25ऑक्टोबर 2023 ते 02नोव्हेंबर2023 पर्यंत 8 दिवसांचे दुसरे उपोषण केले होते. यावेळी जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अतुल सावे आणि उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची समजूत घातल्याने त्यांनी उपोषण मागे घेतलं.
20 जानेवारी ते 27 जानेवारी 2024 रोजी तिसरं उपोषण
मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा एल्गार पुकारत 20 जानेवारी ते 27 जानेवारी 2024 पर्यंत केलेले 8 दिवसांचे उपोषण हे त्यांचे तिसरे उपोषण होते. यावेळी त्यांनी गावातील महिलांच्या हातून हे तिसरे उपोषण सोडवले होते.
8 जून ते 13 जून चौथं उपोषण
मनोज जरांगे यांनी चौथं उपोषण 8 जून 2024 ते 13 जून 2024 या कालावधीत त्यांच्या गावी अंतरवालीत सराटीत सुरु केले. या 6 दिवसांचे हे उपोषण सोडवण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई, अतुल सावे आणि संदीपान भुमरे उपस्थित होते.
मनोज जरांगे यांचे 20 जुलै 2024 पाचवं उपोषण
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला १३ जुलै पर्यंत मुदत दिली होती. मात्र त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्याने पुन्हा २० जुलै २०२४ रोजी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते. यावेळी जरांगे यांचे 5 वे उपोषण 5 दिवस सुरू होते पण उपोषणात तब्बेत खालावत चालल्यानं जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना बळजबरीने सलाईन लावलं होतं. जरांगे यांनी बिड जिल्ह्यातील नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज आणि अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज प्रकरणातील जखमी महिला यांच्या हातून ज्यूस पिऊन हे उपोषण सोडवलं.
17 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर पर्यंतचे सहावं उपोषण
मनोज जरांगे यांचे 17 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर पर्यंतचे सहावे उपोषण केले होते. मराठांच्या समस्या तसेच आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठी त्यांनी उपोषण सुरु केले. परंतु यावेळी देखील सरकार कडून कोणतेच मागण्या मान्य न झाल्याने विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांचे त्यांनी 3 वेळा दौरे केले. राज्य सरकार ‘सगे सोयरे’ कायदा करत नसल्याने जरांगे यांनी 20 जानेवारी 2024 रोजी अंतरवाली सराटी ते मुंबई पायी मोर्चा काढला. मात्र सरकार कडून कोणतेही शिष्टमंडळ न आल्याने गावातील महिलांच्या हातून पाणी पिऊन जरांगे यांनी हे उपोषण सोडवले.
25 जानेवारी 2025 पासून सातवं उपोषण सुरू
25 जानेवारी रोजी मनोज जरांगे यांनी सातव्यांदा उपोषणाची हाक दिली आहे. आंतरवाली सराटीत मनोज जरांगे हे आमरण उपोषणासाठी बसले आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ‘सगे सोयरे’ अंमलबजावणी तातडीने करा, शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, कक्ष सुरू करा, वंशावळ समिती गठीत करा, शिंदे समिती मनुष्यबळ वाढवा, संख्याबळ द्या,नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत.