महर्षी वाल्मीक ऋषी जयंतीनिमित्त यावल अन‌् अंजाळे येथे मिरवणूक, विद्यार्थ्यांना शालेय साहि त्याचे वाटप, ठिकठिकाणी प्रतिमापूजन‎

2 hours ago 1
शहरातील रेणुका माता मंदिराजवळ सार्वजनिक उत्सव समितीने गुरुवारी सायंकाळी महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन कार्यक्रम घेतला. तेथून संपूर्ण शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात सजवलेल्या बग्गीमध्ये महर्षींची सुंदर प्रतिमा ठेवली होती. पालिकेजवळील रेणुका माता मंदिराजवळील श्री महर्षी वाल्मीक नगरच्या गेटजवळ माजी जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे, गणेश महाजन, संजय नन्नवरे आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. नंतर तेथून सवाद्य मिरवणूक निघाली. दरम्यान, यावल तहसील कार्यालयात रामायणकार आद्यकवी महर्षी वाल्मीकी यांची जयंती साजरी झाली. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी प्रतिमापूजन केले. तालुक्यातील अंजाळे येथे महर्षी वाल्मीकी चौकात समस्त आदिवासी टोकरे कोळी बांधवांनी पुतळ्याचे पूजन केले. ग्रा.पं.मध्ये अभिवादन केले. रावेर | रामायण रचनाकार महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त रावेरला शोभायात्रा काढण्यात आली. त्यात आमदार शिरिष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजप लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, श्रीकांत महाजन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उत्सव समिती अध्यक्ष मनोहर कोळी, उपाध्यक्ष शिवा कोळी यांनी योगदान दिले. महर्षी वाल्मीक ऋषीं जयंतीनिमित्त अंजाळे (ता.यावल) येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपप्रसंगी मान्यवर. माध्यमिक शाळेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समाज बांधवांनी कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण केले. नारायण कोळी, भागवत सपकाळे, नितीन सपकाळे, ज्ञानेश्वर सपकाळे, निवृत्ती सूर्यवंशी उपस्थित होते. सायंकाळी गावातून मिरवणूक काढण्यात आली. रांका हायस्कूल, बोदवड बोदवड | येथील रांका विद्यालयात सकाळ व दुपारच्या सत्रात महर्षी वाल्मीकी यांची जयंती साजरी झाली. मुख्याध्यापक पी.एम.पाटील, उपमुख्याध्यापिका एम.एस.बडगुजर व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.एच.एल.पाटील, ए.आर.पाटील यांनी महर्षी वाल्मीकी यांच्याविषयी माहिती दिली. त्यांनी रामायण हे महान महाकाव्य दिल्याचे सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article