प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात अनेक भाविक पोहोचत आहे. सेलिब्रिटी, राजकारणी आणि दिग्गज व्यक्ती देखील महाकुंभ मेळ्यात पोहोचत आहे. अभिनेते अनुपम खेर, गुरु रंधावा यांनी देखील महाकुंभ मेळ्यात स्थान केलं आहे. आता कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा देखील कुंभमेळ्यात पोहोचला आहे. रेमो वेश बदलून महाकुंभ मेळ्यात पोहोचल्यांमुळे त्याला कोणी ओळखू देखील शकलं नाही.
रेमो डिसूझा अशा वेशात महाकुंभ मेळ्यात अशा वेशात पोहोचला त्या वेशात त्याला कोणी ओळखू देखील शकलं नाही. रेमोने काळे कपडे घातले होते आणि त्याने चेहरा देखील काळ्या कपड्याने झाकला होता. फक्त त्याचे डोळे दिसत होते. रेमो डिसूझानेही त्याचा महाकुंभ मेळ्यामधील व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये रेमो नदीत स्थान करताना दिसत आहे. तर कधी ध्यानाला बसलेला दिसत आहे. मध्येच रेमो अनवाणी चालताना दिसक आहे. यावेळी रेमोने कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट न घेता सामान्य भक्ताप्रमाणे महाकुंभ मेळ्याला जाऊन तेथे स्नान केलं.
सध्या सोशल मीडियावर रेमोच्या व्हिडीओची चर्चा सुरु आहे. चाहत्यांना देखील रेमोचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री मोहिना कुमारी सिंग हिने देखील रेमोचं कौतुक केलं आहे. मोहिना म्हणाली, ‘तुझी ही बाजू पाहिल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला आहे.’ पुढे एक चाहते रेमोच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाली, ‘सर तुम्ही गुपचूप आलात आणि कोणाला माहिती देखील पडलं नाही…’ चाहत्यांना रेमोची भक्ती प्रचंड आवडली आहे.
रेमो डिसोझा यांनी स्वामी कैलाशानंद गिरी महाराज यांची भेट घेतली
सांगायंच झालं तर, रेमो त्याच्या पत्नीसोबत महाकुंभ मेळ्यात पोहोचला होता. तेथे रेमो स्वामी कैलाशनंद यांना देखील भेटला. महाराजांचं प्रवचन ऐकल्यानंतर रेमोने त्यांचे आशीर्वाद देखील घेतले. 26 जानेवारी रोजी कुंभमेळ्याचा 26 वा दिवस होता. 26 जानेवारी पर्यंत जवळपास 11 कोटी भक्तांनी महाकुंभ मेळ्यात स्थान केलं आहे.