आता महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी केली जात आहे. (File Photo)
Published on
:
29 Nov 2024, 10:23 am
Updated on
:
29 Nov 2024, 10:23 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी केली जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार आहे. याबाबत महायुतीच्या नेत्यांनी एकमुखाने निर्णय घेतला असल्याचे समजते. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.