एकनाथ शिंदे यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे मान्य केलं. मात्र गृहखात्यावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. कोणती खाती कोणाला जाऊ शकतात? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
दिल्लीत मुख्यमंत्रिपदावरून जसं नाव अंतिम होणार तसंच मंत्रिमंडळावरही शिक्कामोर्तब होईल. शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर रस्सीखेच गृहखात्यावरून सुरू झाली आहे. २०१४ आणि २०२२ मध्ये देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते. मात्र आता एकनाथ शिंदेंना गृहखातं हवंय, अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय. मुख्यमंत्रिपदावरून दावा सोडल्यानंतर गृहखातं पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. मात्र गृहखातं आपल्याकडेच राहावं यासाठी भाजप आग्रही आहे. जसं गृहखातं एकनाथ शिंदे यांना हवं तसं अर्थखातं अजित पवारांना हवंय. गेल्या अडीच वर्षात महायुती सोबत आल्यापासून अर्थखातं अजित पवारांकडे आहे. पुन्हा अर्थखातं अजित पवारांना देण्यास भाजपची काही अडचण नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये गृहखात्यावरूनच रस्सीखेच सुरू आहे. महाराष्ट्रात एकूण ४३ मंत्री होऊ शकतात. भाजपचे १३२ आमदार आहेत. शिवसेनेचे ५७ आमदार तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आलेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपला २३ ते २५ मंत्रिपदं, शिंदेंना ९ ते १० तर राष्ट्रवादीच्या आमदारांना ८ ते ९ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Nov 29, 2024 11:07 AM