महायुतीत कुणाला किती जागा? एक्झिट पोलची आकडेवारी काय?; सर्वात वेगवान अपडेट पाहा

3 days ago 2

Maharashtra Exit Poll 2024 : गेल्या पाच वर्षात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आज महाराष्ट्रातील विधानसभा निव डणुकीसाठी मतदान पार पडले. राज्यातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. येत्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाले. त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यातील मतदान संपल्यानंतर आता महाराष्ट्रातील एक्झिट पोल समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल येण्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीतून कुणाची सत्ता राज्यात येऊ शकते किंवा कशी राजकीय परिस्थिती निर्माण येऊ शकते, याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार, महायुतीला राज्यात 122 ते 186 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 69 ते 121 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर इतर अपक्षांना 12 ते 29 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 77 ते 108 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल असा अंदाज आहे. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 27 ते 50, राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला 18 ते 28 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्याची शक्यता आहे.

तर महाविकासआघाडीत काँग्रेस हा सर्वाधिक जागांवर यश मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेसला 28 ते 47 जागांवर यश मिळू शकतो. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाला 25 ते 39 जागा आणि ठाकरे गटाला 16 ते 35 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article