Published on
:
23 Nov 2024, 12:03 pm
Updated on
:
23 Nov 2024, 12:03 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra Assembly Election Results : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने निर्विवाद यश मिळवले. महायुतीला २८८पैकी तब्बल २२३ जागा मिळत असल्याचे चित्र आहे. तर महाविकास आघाडीला फक्त ५३ जागा मिळत आहेत. महायुतीच्या या भव्यदिव्य यशात भारतीय जनता पक्षाचा वाटा १२९ जागांचा आहे. तर शिवसेना (शिंदे गट) यांना ५४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना ४० जागांवर यश मिळाले आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस (१९), शिवसेना, उद्धव ठाकरे (२१) आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार (१३) यांना दारूण पराभव पत्कारावा लागला आहे. अन्य १२ जागांवर अपक्ष आणि इतर पक्षांनी यश मिळवले. काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे.
प्रमुख विजयी उमेदवारांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, आदित्य ठाकरे आदींचा समावेश आहे.
तर प्रमुख पराभूत उमेदवारांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री बच्चू कडू आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांचा समावेश आहे.