महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळाली. मात्र 11 नंतर चित्र स्पष्ट होत गेले आणि महायुती 200 पार गेली. महायुतीला मिळालेल्या पाशवी बहुमतानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, अशी मागणी केली.
संजय राऊत यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. Ballet paper (मत पत्रिका) वर
पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही. नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही, असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Ballet paper (मत पत्रिका) वर
पुन्हा निवडणुका घ्या.
महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही!
असा निकाल लागूच शकत नाही.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 23, 2024