महाराष्ट्रात महायुतीची बहुमताकडे वाटचाल:एक है तो ‘सेफ’ है !, मोदी है तो मुमकिन हैं ! देवेंद्र फडणवीस यांचे विजयानंतर ट्विट

3 hours ago 1
विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळाल्यानंतर आता भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक है तो ‘सेफ’है !, मोदी है तो मुमकिन हैं! असे ट्विट केले आहे. यावाक्यावरुन विरोधकांनी खूप गदारोळ केला होता. दरम्यान धर्मयुद्ध आणि एक है तो सेफ है चा नारा जनतेने मान्य केला आहे. आता राज्याचा विकास वेगाने होईल, असे प्रवीण दरेकरांनीही म्हटले आहे. भाजपने विधानसभेच्या 149 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी130 जागांवर त्यांना आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट हा 85 टक्क्यांहून अधिक मानला जात आहे. दक्षिण पश्चिममधून फडणवीस विजयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'पुन्हा' मुख्यमंत्रिपदी येण्याचा मार्ग प्रशस्त होताना दिसत आहे. कारण नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस विजयी झाले आहेत. महायुती 218 जागांवर पुढे आहे. त्यामुळे भाजपमधून फडणवीसांना मुख्यमंत्रिपदी पाहण्याचा आवाज बुलंद होत आहे. फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे दावेदार​​​​​​​ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सत्ताधारी महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यात सुरुवातीच्या कलात भाजपने सर्वाधिक 126 जागांहून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपची राज्यातील ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. त्यामुळे फडणवीस यांचे नेतृत्व अधिकच झळाळून निघाले असून, तेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असतील हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर शनिवारी झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी महायुतीची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने सर्वाधिक 214 जागांवर आघाडी घेतली असून, त्यात भाजपने सर्वाधिक 127, शिवसेना 53 व राष्ट्रवादी काँग्रेसने 34 जागांवर आघाडी घेतली आहे. तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने 54 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात काँग्रेसने 19, ठाकरे गटाने 21 तर शरद पवार गटाने 14 जागांवर आघाडी घेतली आहे. दरेकरांचे सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, मला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्रात महायुती 200 पार जाईल असे चित्र दिसून येत आहे. माझ्या मताने संपूर्ण महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस, बाजूने उभा आहे. त्यामुळे महायुतीला एक मोठे यश मिळत आहे. आता संजय राऊत आणि विरोधी पक्ष रडीचा डाव खेळू लागलेत. माझ्या मताने लोकशाहीमध्ये पराभव आपण मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article