महाराष्ट्रातील असं एक हिल स्टेशन जिथे जाताच तुम्ही महाबळेश्वर, माथेरानला विसरून जाल

4 days ago 2

आपल्यातील अनेकांना जग भ्रमंती करायला खूप आवडते. अशी लोकं जगाच्या पाठीवर कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन निसर्गाचा आनंद लुटतात. पण तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रात देखील अशी काही ठिकाणं आहेत जिथे जाऊन तुम्हाला प्रसन्नता वाटेल आणि तुमच्या मनाला आनंद वाटेल. तर

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात एक असे ठिकाण आहे ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. तुम्ही जर या ठिकाणी गेल्यावर इथलं नैसर्गिक सौंदर्य बघून तुमचं मन हरपून जाईल. देशाच्या कानाकोपऱ्यात फिरायला आवडणाऱ्या लोकांना शहरांमध्ये लपलेली सुंदर ठिकाणे पाहणे आणि नवीन ठिकाणे शोधणे आवडते.

अशा लोकांना ही जागा स्वर्गासारखी वाटणार आहे. हे असे ठिकाण आहे जिथे आपल्याला हवामान थंड वाटेल. निसर्गाच्या सान्निध्यात हे ठिकाण शांत आणि बजेटफ्रेंडली आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला या ठिकाणाची सविस्तर माहिती देणार आहोत. जर तुम्ही आजच्या आधी इथे आला नसाल तर तुम्हाला खरोखरच ही जागा नंदनवन वाटणार आहे.

तोरणमाळ हिल स्टेशन

ट्रेकिंग आणि कॅम्पिंग करणाऱ्या लोकांनाही हे हिल स्टेशन आवडेल. ट्रेक करायचा असेल तर सीताखाई ट्रेलवर ट्रेक करू शकता. मच्छिंद्रनाथ महाराजांची गुहा देखील येथे आहे. ही नैसर्गिकरित्या तयार झालेली गुहा आहे. ही गुहा मच्छिंद्रनाथांचे ध्यानस्थान मानली जाते. हे महाराज एक महान तपस्वी होते. तसेच त्यांना माशांचा स्वामी म्हणूनही ओळखले जाते. याशिवाय तोरणमाळमधील महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाणारे गोरखनाथ मंदिर देखील आहे.

यशवंत तलाव आणि लोटस तलाव

तोरणमाळ हिल स्टेशनचे सर्वात खास तलाव म्हणजे यशवंत तलाव आणि लोटस तलाव. हे तलाव तोरणमाळ हिलचे खास नैसर्गिक आकर्षणासाठी ओळखले जाते. लोटस लेकमध्ये तुम्हाला अनेक कमळाची फुले एकत्र पाहायला मिळतील. याशिवाय तोरणमाळ हिल स्टेशन हिरव्यागार झाडांनी आणि जंगलांनी वेढलेले आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींना हे ठिकाण अधिक आवडते. नंदुरबारमधील प्रेक्षणीय ठिकाणांपैकी हे एक स्थळ आहे.

कसे पोहोचायचे?

तुम्हाला देखील आता नंदुरबारच्या तोरणमाळ येथे जाण्याची उत्सुकता लागलीच असेल. तोरणमाळ मुंबईपासून सुमारे ४६५ किमी अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करू शकतात. यानंतर नंदुरबार रेल्वे स्थानकावर उतरल्यावर तुम्ही बस किंवा कॅबने तोरणमाळ हिल स्टेशनपर्यंत पोहोचू शकता.

तोरणमाळसाठी महाराष्ट्रातील इतर शहरांतूनही बसेस उपलब्ध आहेत, मात्र त्यासाठी वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही थेट बसनेही प्रवास सुरू करू शकता.

जर तुम्ही तुमच्या कारने प्रवास करत असाल तर तुम्हाला जास्त वेळ घालवावा लागेल तसेच एवढ्या लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागेल. ट्रेनने तुम्ही फक्त ६०० ते ७०० रुपयांत सहज पोहोचू शकता, तर कारने येताना एकतर्फी पेट्रोल आणि टोल चा खर्च जोडून २०००रुपयांपर्यंत जाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला देखील या निसर्गाने वेढलेल्या व नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्रातील एक चांगले ठिकाण आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article