राहुल गांधी हाजीर हो! पुणे न्यायालयाचं समन्स; 2 डिसेंबरला उपस्थित राहण्याचे हमीपत्रfile photo
Published on
:
23 Nov 2024, 11:45 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:45 am
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीचा थेट परिणाम पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकांवर होणार आहे. आम आदमी पक्ष (आप) आणि राष्ट्रीय जनता दल (राजद), जे दोन्ही ठिकाणी विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा भाग आहेत, जागावाटपाच्या बाबतीत काँग्रेसकडे जास्त लक्ष देणार नाहीत. दिल्लीत केजरीवाल काँग्रेसला एकही जागा न सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. तर बिहारमध्ये राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव काँग्रेसला जास्त जागा देण्याच्या मनस्थितीत नसतील. जास्तीत जास्त काँग्रेसला केवळ ५० जागा सोडण्यास लालू प्रसाद यादव तयार होण्याची शक्यता आहे.
बिहार विधानसभेत सध्या काँग्रेसचे १९ आणि आरजेडीचे ७७ आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आणि डावे पक्ष एकत्र लढले होते. जागावाटपात काँग्रेसला ७० जागा मिळाल्या होत्या, तर राजदने १४४ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र महाराष्ट्राचे निकाल समोर आल्यानंतर बिहारमध्ये राजद आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून खडाजंगी होण्याची शक्यता बळावली आहे. बिहारमध्ये कमकुवत झालेल्या काँग्रेसला राजदसमोर झुकावे लागणार आहे.
त्याचवेळी दिल्लीत २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे खातेही उघडले नाही. काँग्रेस आणि आपने लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. आम आदमी पक्षाने दिल्लीतील ४ जागांवर आणि काँग्रेसने ३ जागांवर समान उमेदवार उभे केले होते. मात्र दोन्ही पक्षांनी दिल्लीत खातेही उघडले नाही. आता दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्ष काँग्रेससोबत लढणार नाही, हे जवळ जवळ निश्चित आहे.