महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या मतदारसंघात मुद्द्यांची निवडणूक शाब्दिक हल्ल्यांच्या प्रहारावर:पैसे वाटल्याच्या आरोपावरून रोहित पवार -राम शिंदे यांच्यात जुंपली

3 days ago 2
मतदानाच्या पूर्वसंध्येला व मतदानाच्या दिवशी मतदारांना पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून राज्यातील प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या कर्जत -जामखेडमध्ये आमदार तथा उमेदवार रोहित पवार व विधान परिषदेचे आमदार तथा उमेदवार राम शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून एका माध्यमातून समोरासमोर पवार -शिंदे प्रतिक्रिया देत असताना रोहित पवार यांनी त्यांची माझ्यासमोर बोलण्याची लायकी नाही असे म्हटले. तर त्याचवेळी समोरून राम शिंदे यांनी आमची लायकी काढू नका, असा जोरदार हल्ला केला. पैसे वाटल्याचे मुद्द्यावरून रोहित पवार म्हणाले हा सगळा वेडेपणा आहे. जो माणूस पकडला तो माझा आहे असे सर्वजण म्हणत आहेत. माझा तिथे कारखाना आहे. असे ते सांगत असतानाच राम शिंदे म्हणाले कुणाला किती दिले याची यादी वाचा. यावर रोहित पवार म्हणाले ज्या व्यक्तीला महिला बद्दल कसे बोलायचे हे माहित नाही ? असा व्यक्ती समोर असेल तर मी बोलणार नाही. ते समोर नसल्यानंतर मला फोन करा असे रोहित पवार म्हणाले. ज्याची बोलायची लायकी नाही, यावर राम शिंदे म्हणाले लायकी काढू नका. दरम्यान मतदान प्रक्रिया दरम्यान रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक विनय डुकरे यांना आनंदवाडी येथे बोगस मतदान करताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पकडले. याबाबत निवडणूक विभागाकडे भाजपकडून ऑनलाईन तक्रार देखील करण्यात आली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article